ताज्याघडामोडी

अजित पवार यांची मोठी घोषणा वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती

करोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर

पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर     पंढरपूर, दि. 01 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिपत्याखालील पंढरपूर  उप माहिती कार्यालय हे ‘कनकाक्षर’ बंगला पत्रकानगर, एमटीडीसीसमोर, भक्ती मार्ग, पंढरपूर येथे दिनांक 01 मार्च 2021 पासून स्थलांतरीत करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांनी दिली आहे.          उप माहिती कार्यालयाचे  […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सरकोली येथे अवैध वाळू उपशावर पुन्हा तालुका पोलिसांची कारवाई 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे काल तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली असून या कारवाईत भीमा नदीच्या पात्रातून थेट जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याचे उघड झाले आहे.गेल्या काही महिन्यात सरकोली परिसरातील भीमा नदीकाठच्या भागातून सातत्याने वाळू चोरीच्या घटना पोलीस कारवायांतून उघड होत असतानाच वाळू चोरी मात्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे.      रविवार दिनांक २८ […]

ताज्याघडामोडी

बहुजन समाज पार्टी च्या जिल्हा महासचिव पदी रवी सर्वगोड

बहुजन समाज पार्टी च्या जिल्हा महासचिव पदी रवी सर्वगोड पंढरपूर प्रतिनिधी बहुजन समाज पार्टी जिल्हा कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे पार पडली. राज्य सचिव आप्पासाहेब लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष अॅड संदिप ताजने यांच्या आदेशाने रवी सर्वगोड यांची सोलापूर जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात […]

ताज्याघडामोडी

पाटस येतील तीन सख्या भावांचा आठ दिवसात कोरोनामुळे मृत्यू 

पाटस तालुका दौंड येथील तीन सख्या भावांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. केवळ अवघ्या आठ दिवसांत या तिन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. घटनेबद्दल नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.ग्रामीण भागातही करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  आहे  एका कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा (दि.19) मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याच कुटुंबातील आणखी चौघांवर […]

ताज्याघडामोडी

बंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेसवर सोलापूर जिल्हा हद्दीत दरोडा 

बंगळुरू – अहमदाबाद या सुपरफास्ट ट्रेनवर सोलापूर जिल्ह्यातील बोरोटी-नागणसूर हद्दीत दरोडा पडल्याची प्राथमिक माहिती असून  सोमवारी पहाटेच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी या ट्रेनमधील महिला प्रवाशांना मारहाण करीत  ५० तोळे सोने ओरबडून नेल्याचे समजते.    याबाबत संबंधित महिला प्रवाशांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे.

ताज्याघडामोडी

पंढरपुर शिवसेनेच्या निवडी जाहीर, शिवसेना सोलापुर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत सर यांनी केले नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन.

शिवसेना सोलापुर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत सर यांनी केले नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन. शिवसेना पंढरपुर कार्याध्यक्षपदी अनिल कसबे, शिवसेना पंढरपुर संघटकपदी गणेश ( बापू ) घोडके, शिवसेना पंढरपुर सचिवपदी कैलास लोकरे तर शिवसेना पंढरपुर प्रसिद्धीप्रमुखपदी अमित ( पिंटू ) गायकवाड यांच्या निवडी आज पंढरपुर येथे झालेल्या शिवसेना सभासद नोंदणी कार्यक्रमात शिवसेना सोलापुर जिल्हा प्रमुख […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भूमिअभिलेखच्या लाचखोर लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरी

तक्रारदार यांना फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच मागून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी भूमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक कृष्णात यशवंत मुळीक (वय 47, रा. प्लॉट नं. 16, जेजुरीकर कॉलनी, सिद्धनाथवाडी, वाई) यास येथील विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी 4 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड व तो न दिल्यास 2 महिने […]

ताज्याघडामोडी

चित्रा वाघ यांना एवढं आक्रमक व्हायचं कारण काय ?

सुरेश खोपडे यांची फेसबुक पोस्ट काय? पूजा चव्हाण मृत्यूचा तपास व्हायला पाहिजे. दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. पूजाचा मृत्यू म्हटलं तर अपघात किंवा आत्महत्या या दोन शक्यता आज वर आलेल्या बातम्या आणि आरोप वरून वाटते. मी 35 वर्षे पोलिस दलात नोकरी केली. अनुभवी व चाणाक्ष पोलिस अधिकाऱ्याने दोन तास घटनास्थळावर तपास केला तर तो खून आहे […]

ताज्याघडामोडी

पराभूत उमेदवाराकडून नूतन महिला सरपंचास व कटूंबास मारहाण 

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. यावेळी जनतेतून सरपंच निवड नसल्यामुळे अनेकठिकाणी सरपंचपदासाठी घोडेबाजार झाल्याचे पाहायला मिळाले. यातून अनेक ठिकाणी वाद झाले. पुणे जिल्ह्यातील मोहकल येथे पराभूत उमेदवाराने नवनिर्वाचित सरपंच महिलेला मारहाण केल्याचे समोर आले आहे.सरपंचपदी निवड झाल्यानंतर पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित सरपंच महिला व त्यांच्या कुटुंबाला घरात घुसुन बेदम मारहाण झाली. खेड […]