पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंजिनिअरींगच्या प्रथम वर्ष विभागाच्या ‘इंडक्शन प्रोग्राम’अंतर्गत चित्रकलेचे व हस्तकलेचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. प्रदर्शनातील कलाकृती पाहून कुलगुरू महोदयांनी स्वेरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची पाठ थोपटली.
प्रत्येक वर्षी प्रथम वर्ष इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर साधारणपणे एक आठवडाभर ‘इंडक्शन प्रोग्राम’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विभागाअंतर्गत चित्रकला व हस्तकला प्रकल्पांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या चित्रकला व हस्तकला प्रकल्पांचे प्रदर्शन राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या चित्र व हस्तकलेचे विविध आविष्कार पहावयास मिळाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी निसर्ग चित्र, स्वच्छता, राम मंदिर, स्वेरीची प्रतिकृती, प्राणी चित्र, वस्तू चित्र, व्यक्ती चित्र, विविध इमारतींचे नमुने, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, थोर महापुरुष, विविध कलाकृती हे सर्व पेन्सिलने रेखाटलेले होते तसेच राममंदिर, महादेव मंदिर, पुंडलिक मंदिर यासारख्या विविध मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या होत्या. विविध शास्त्रीय उपकरणांचे मॉडेल्स सुद्धा विद्यार्थ्यांनी या उपक्रमात बनविले होते. ह्या प्रतिकृती पाहण्यासाठी स्वेरीतील विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी प्रत्येक चित्र अत्यंत रेखीवपणे, आकर्षक आणि सजीव वाटणारे असे रेखाटले होते. शिक्षणातून वेळ काढून काही काळ आपले छंद जोपासले पाहीजेत, या हेतूने अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना व छंद कागदावर रेखाटले होते. सर्व कलाकृती पाहून त्या बाबतची माहिती कुलगुरू महोदयांनी जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या कला आविष्कारांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनविलेली जवळपास ५०० छायाचित्रे व कलाकृती मांडल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत एस.पी.कॉलेज, पुणेचे माजी प्राध्यापक विनय रमा रघुनाथ, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी. डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख डॉ. आर. एन. हरीदास, सर्व अधिष्ठाता, प्रथम वर्ष इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.