पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे काल तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली असून या कारवाईत भीमा नदीच्या पात्रातून थेट जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याचे उघड झाले आहे.गेल्या काही महिन्यात सरकोली परिसरातील भीमा नदीकाठच्या भागातून सातत्याने वाळू चोरीच्या घटना पोलीस कारवायांतून उघड होत असतानाच वाळू चोरी मात्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
रविवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना सरकोली हद्दीतून भीमा नदीतून अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली असता पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत पांडूरंग बाळासाहेब कराळे वय 27 वर्ष रा सरकोली ता. पंढरपूर 2) शेतमालक सागर बाबुराव माने रा, सरकोली 3)३) जेसिबी मालक सुनिल काका भोसले रा. सरकोली 4)जिवन दत्तात्रय भोसले रा, सरकोली ता. पंढरपूर यांच्या विरोधात भा.द.वि. 379,34 सह गौण खनिज कायदा 1978 चे कलम 4(1),4(क) (1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.