ताज्याघडामोडी

अकलूज येथील सत्कार सोहळ्यात जेष्ठ नेते शरद पवार देणार माढ्यातुन उमेदवारी बाबत सूचक संकेत ?

कॉग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे अकलूज येथे भव्य आयोजन 
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय निरीक्षक करीत आहेत इतिहासाची उजळली ? 

 

 

कॉग्रेसचे जेष्ठ नेते,देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी अकलूज येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषद,जिल्हा बँक आणि लेबर फेडरेशन सह विविध जिल्हा स्तरीय सहकारी संस्थांवर १९८० आणि ९० च्या दशकात मोहिते पाटील यांचे मोठे वर्चस्व राहिल्याचे दिसून येते तर सुशीलकुमार शिंदे हे जरी कॉग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते तरीही त्यांना सोलापूर शहर महानगर पालिकेपुरते मर्यादित ठेवण्यासाठी मोहिते पाटील हे समर्थकांच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत होते.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात यातूनच कॉग्रेस आणि पुढे कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीत मोहिते पाटील समर्थक आणि सुशीलकुमार शिंदे समर्थक यांच्यातील सुप्त संघर्ष जिल्हयाच्या राजकारणात पाहावयास मिळत होता.२००३ मध्ये पार पडलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपतून उमेदवार राहिलेले स्वर्गीय प्रतापसिह मोहिते पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक राहिलेले कॉग्रेसचे उमेदवार माजी राज्यमंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते यांना आव्हान देत विजय संपादन केला होता.आणि त्यावेळी सोलापूर लोकसभा मतदार संघातील सकल मोहिते पाटील समर्थक पक्षभेद बाजूला सारत स्वर्गीय प्रतापसिह मोहिते पाटील यांच्या विजयासाठी परिश्रम घेत होते अशीच चर्चा त्या काळी झाली.

२००४ मध्ये करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि या निवडणुकीत मोहिते पाटील समर्थकांनी मैदानात उतरविलेल्या पॅनलचा पराभव करण्यासाठी करमाळा तालुक्यातील या कारखान्याच्या सभासदांनी तितक्याच ताकतीने निर्धार केल्याचे दिसून आले.या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमिताने अजित पवार यांचा फोटो असलेले करमाळा तालुक्यात झळकलेले मै हु ना चे डिजिटल बोर्ड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता आणि आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मोहिते पाटील सर्मथक पॅनलचा पराभव झाला होता.करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी स्वाभिमान जपला अशीच भावना या विजयानंतर व्यक्त होताना दिसुन आली होती.राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये इथूनच खऱ्या अर्थांने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांना ताळ्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे वरिष्ठ नेतेच खतपाणी घालत आहेत अशाच आशयाच्या बातम्या त्याकाळी प्रसार माध्यमातून झळकताना दिसून आल्या होत्या.

२०१७ पासून मोहिते पाटील यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा पुढे करीत वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली होती.याच दरम्यान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी विजयसिह मोहिते पाटील यांच्या स्वप्नपुर्तीसाठी भाजप प्रवेश करीत विद्यमान आमदार रणजितसिह मोहिते पाटील आणि विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्याकाळी शरद पवार यांना मोठा धक्का दिला होता.पुढे जलशक्ती मंत्रालयाकडून कृष्णां भीमा पूर प्रवर्तन योजनेस केंद्र शासनाची मंजुरी मिळाली.मात्र हे सारे घडत असतानाच माढा मतदारसंघात तत्कालीन खासदार रणजितसिह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी विकोपाला जात असल्याचे पाहावयास मिळाले.यातूनच धैर्यशील मोहिते पाटील यांनी ऑक्टोबर २०२३ पासूनच भाजपकडे अप्रत्यक्ष आपणच उमेदवारीचे दावेदार असल्याचे दाखवून देण्यास सुरुवात केली.तत्कालीन खासदार निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करताना दिसून येऊ लागले.

आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.जसे माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आपला करिष्मा दाखिवला तसेच सोलापूर लोकसभा मतदार संघात देखील कॉग्रेसचा करिष्मा कायम असल्याचे चित्र आहे.आता मोहिते पाटील हे कॉगेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा अकलूज येथे ८४ व्या वाढिदवसानिमित्त अभीष्टचिंतन सत्कार सोहळ्याचे आयोजन करीत सत्कार करीत आहेत.जेष्ठ नेते शरद पवार देखील या सत्कार सोहळ्यास उपस्थित रहात आहेत त्याच बरोबर सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्षात विखुरलेले मोहिते पाटील सर्मथक देखील मोठ्या संख्येने या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहतील असे म्हटले जात आहे.अर्थात भाजपने विधान परिषदेची आमदारकी दिलेले आमदार रणजितसिह मोहिते पाटील हे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात व्यासपिठावर उपस्थित रहाणार का ? याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

तर सोलापूर जिल्ह्यात पक्ष नव्हे तर मोहिते पाटील गटाची पुन्हा जोरदार बांधणी करीत जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व पुन्हा स्थापित करण्यासाठी मोहिते पाटील यांनी कॉग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्याचे आयोजन केल्याची चर्चा होताना दिसून येत आहे.माढा विधानसभा मतदार संघातून मोहिते पाटील कुटूंबातील सदस्य उमेदवार नसेल असे वक्तव्य लोकसभेतील विजयानंतर जयसिह मोहिते पाटील यांनी केले होते.मात्र तरीही माढा विधानसभा मतदार संघातून मोहिते पाटील परिवारातील सदस्यांची नावे चर्चेत आहेत.त्यामुळे विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार बबनदादा शिंदे विरोधकांत देखील सुप्त अस्वस्थता निर्माण झाल्याचेच म्हटले जात आहे.तर रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी अकलूज येथे आयोजित सत्कार सोहळ्यात शरद पवार हे माढा विधानसभा मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवार म्हणून मैदानात उतरविणार या बाबत सूचक संदेश देतील आणि लोकसभेतील विजयानंतर बाळदादानी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत माढा मतदार संघातून मतदार संघातीलच उमेदवार देणार का ? या बाबत सूचक भाष्य करतील अशीच चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *