पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर
पंढरपूर, दि. 01 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिपत्याखालील पंढरपूर उप माहिती कार्यालय हे ‘कनकाक्षर’ बंगला पत्रकानगर, एमटीडीसीसमोर, भक्ती मार्ग, पंढरपूर येथे दिनांक 01 मार्च 2021 पासून स्थलांतरीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांनी दिली आहे.
- उप माहिती कार्यालयाचे 01 मार्च 2021 पासून नवीन जागेत नियमीत कामकाज सुरू असून, यापुढे या कार्यालयाशी संबंधित असलेला पत्रव्यवहार व संपर्क उप माहिती कार्यालय, ‘कनकाक्षर’ बंगला पत्रकानगर, एमटीडीसीसमोर, भक्ती मार्ग, पंढरपूर, ता.पंढरपूर, जिल्हा सोलापूर या पत्त्यावर करावा.तसेच या कार्यालयाचा नवीन दुरध्वनी क्रमांक 02186-295914 असून, ई-मेल आय.डी- [email protected] असा आहे. सर्व संबंधितांनी कार्यालयाच्या जागा बदलाची नोंद घ्यावी असे आवाहनही जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांनी केले आहे.