ताज्याघडामोडी

स्वेरीकडून ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम संपन्न स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून या उपक्रमांचे यशस्वी आयोजन

पंढरपूर: युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सेवा योजना (मंत्रालय कक्ष), उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या निर्देशानुसार ‘स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता’ या घोषवाक्यासह दि.१७ सप्टेंबर २०२४ ते दि. १ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत स्वच्छता विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत कळवण्यात आले होते. त्या अनुषंगाने स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून दि. २३ सप्टेंबर २०२४ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये स्वेरीतील विद्यार्थ्यांनी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 
        गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाकडून स्वच्छता विषयक विविध कार्यक्रम राबविण्यात आले. दि. २३ सप्टेंबर रोजी स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाकडून गोपाळपूर येथे ‘स्वच्छता रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये सुमारे २०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या रॅलीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी गोपाळपूर चौक पासून म्हाडा कॉलनी, मातोश्री वृद्धाश्रम, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे गोपाळकृष्ण मंदिर परिसरात स्वच्छतेविषयी जनजागृती केली तसेच  शाळा, धार्मिक स्थळे, बस स्थानक, गाव चावडी, मुख्य चौक, बाजार, चाळ आदी वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचे नागरिकांना आवाहन केले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाकडून दि. २४ सप्टेंबर रोजी गोपालकृष्ण मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सदर उपक्रमात इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील सुमारे ९० विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. दि.२५ सप्टेंबर रोजी स्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरींग या विभागातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी चौक आणि विठ्ठल मंदिर परिसरामध्ये स्वच्छता विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली. या उपक्रमासाठी विभागातील सुमारे १६० विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. स्वेरीतील सिव्हील इंजिनिअरींग, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरींग तसेच एमबीए आणि एमसीए च्या सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी या स्वच्छता विषयक मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सिव्हील इंजिनिअरींग विभागातील सुमारे १२० विद्यार्थ्यांनी दि. २६ सप्टेंबर रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता केली. दि. २८ सप्टेंबर रोजी स्वेरीतील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी भारत पेट्रोलियमच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत पुंडलिक मंदिर परिसर आणि चंद्रभागा नदी किनारा या परिसरात उत्स्फुर्तपणे स्वच्छता मोहीम राबविली. दि. २९ सप्टेंबर रोजी स्वेरीच्या एमबीए आणि एमसीए विभागाच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी  रेल्वे स्टेशन परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविली. या सर्व स्वच्छता विषयक उपक्रमांमध्ये स्वेरीतील सुमारे ५० प्राध्यापकांनीही सहभाग घेतला. ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत महाविद्यालयामध्ये देखील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. २४ सप्टेंबर रोजी संस्थेमध्ये प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि राजयोग शिक्षण आणि संशोधन केंद्र यांच्या सहयोगाने ‘निसर्ग, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमासाठी स्वेरीतील सुमारे ४००० विद्यार्थी व सुमारे ३०० शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय दि. २८ व २९ सप्टेंबर रोजी स्वच्छता विषयक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वसतिगृहांमध्ये ‘क्लीन रूम’ स्पर्धा आदी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व कॅम्पस इनचार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख डॉ. एस. बी. भोसले, डॉ. एस. पी. पवार, डॉ. एस. पी. पाटील, डॉ. दिप्ती तंबोळी, डॉ. यशपाल खेडकर, डॉ. सुमंत आनंद, डॉ. के. पी. गलानी, प्रा. एम.वाय शेख,  विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. एम. आवताडे, डॉ. डी. एस. चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वेरीच्या विविध विभागातील सर्व समन्वयक प्रा. के.पी. पुकाळे, प्रा. एस.डी.माळी, प्रा. जी. जी. फलमारी, प्रा. एम.ए. सोनटक्के, प्रा. एस. बी. खडके, प्रा. बी.टी. गडदे, प्रा. व्ही.टी. भानवसे, प्रा. एस. डी. इंदलकर, प्रा. एस. एम. शिंदे यांच्या सहयोगातून ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत स्वच्छता विषयक सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *