श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या विविध विभागातील तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनीकडून उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
कर्मयोगी मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणा बरोबरच कार्पोरेट क्षेत्रामध्ये आवश्यक असणार्या सर्व मूलभूत कौशल्यांचा सखोल अभ्यास करून प्रशिक्षीत केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून झेंसार कंपनीकडून नोकरीसाठी आवश्यक असलेले उच्च दर्जाचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
झेंसार प्रा. ली. ही एक सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून या कंपनीकडून विद्यार्थ्यांना एप्टिट्यूड स्किल, सॉफ्ट स्किल, अॅडव्हान्स जावा, सॉफ्टवेअर टेस्टिंग, ओरॅकल डेटा बेस इत्यादी टेक्निकल स्किल चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळण्यासाठी होणार आहे. भविष्यातील कार्पोरेट क्षेत्रातील गरज ओळखून तृतीय वर्षामधेच विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे प्रशिक्षण दिले जातेय यामुळे कर्मयोगीमधील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण होण्या आधीच मोठ्या पगारची नोकरी मिळण्याची संख्या प्रचंड आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा.एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. व्ही एल जगताप, प्रा. सुशील कुलकर्णी, प्रा. दत्तात्रय चौगुले, प्रा. योगेश माने तसेच सर्व प्राध्यापक यांनी प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.