ताज्याघडामोडी

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचा ‘पोस्टर मेकिंग’ स्पर्धेत प्रथम क्रमांक

पंढरपूर- सांगोल्यात दि.२७ सप्टेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ‘पोस्टर मेकिंग’ स्पर्धेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पॉलि.), पंढरपूरच्या विद्यार्थिनींनी प्रथम पारितोषिक मिळवून यश संपादन केले त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
          स्वेरीमध्ये नावातच संशोधन असल्यामुळे विद्यार्थी देखील सातत्याने संशोधनात व्यस्त असतात. आता अभियांत्रिकी बरोबरच फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी संशोधनाकडे आपले लक्ष केंद्रित करत आहेत हेच या स्पर्धेद्वारे स्पष्ट होते. सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘जागतिक औषधनिर्माणशास्त्र दिवस’ निमित्त आयोजिलेल्या राज्यस्तरीय ‘पोस्टर मेकिंग’ स्पर्धेत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (पॉलि.) च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी रोहिणी जगन्नाथ शिंदे आणि प्रणिता सुरेश खरात यांनी सादर केलेल्या पोस्टरला प्रथम क्रमांकाचे रोख रु. पाच हजार, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रोहिणी शिंदे आणि प्रणिता खरात यांना स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे आणि प्रा.  एस. ए. शेख यांचे मार्गदर्शन लाभले. सदरच्या  विद्यार्थिनींनी ‘पोस्टर मेकिंग’ स्पर्धेत  ‘फार्मसीस्ट मिटिंग ग्लोबल हेल्थ नीडस्’ या विषयावर पोस्टर सादर केले होते त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थीनींचे संस्थेचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *