ताज्याघडामोडी

बंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेसवर सोलापूर जिल्हा हद्दीत दरोडा 

बंगळुरू – अहमदाबाद या सुपरफास्ट ट्रेनवर सोलापूर जिल्ह्यातील बोरोटी-नागणसूर हद्दीत दरोडा पडल्याची प्राथमिक माहिती असून  सोमवारी पहाटेच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी या ट्रेनमधील महिला प्रवाशांना मारहाण करीत  ५० तोळे सोने ओरबडून नेल्याचे समजते.  

 याबाबत संबंधित महिला प्रवाशांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *