ताज्याघडामोडी

देशाच्या विकासासाठी भारतरत्न डॉ.कलाम यांचा आदर्श घेतला पाहिजे-निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर स्वेरीमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जागतिक विद्यार्थी दिन’ साजरा

पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असाल तर संशोधनामध्ये नक्की  करिअर करा. ज्यांना शिकण्याचे तंत्र माहीत नाही ते शिकूच शकत नाहीत या तंत्रानुसार डॉ.अब्दुल कलाम हे सामान्य माणसाकडे देखील बारकाईने लक्ष देत असत. डॉ.कलाम म्हणायचे ‘माणूस मुळीच निवृत्त होत नसतो. जेंव्हा तुम्ही येथून निघून जाल तेंव्हाच तुम्ही निवृत्त व्हाल, तोपर्यंत आपल्या कार्यात सातत्य ठेवा.’ नोकरी मिळवणे हा फार मोठा पराक्रम नाही पण गुणवत्तापूर्ण नोकरी मिळवणे यात मात्र कौशल्य आहे. संशोधन करताना आपले संशोधन हे पेटंटच्या दर्जापर्यंत घेऊन जाता आले पाहिजे. जर प्रॉब्लेम कळला तरच त्यातून संशोधन होत असते म्हणून छोट्या छोट्या संकल्पनातून मोठ-मोठ्या ध्येयाकडे जाता येते. जर देशाला पुढे न्यायचे असेल तर भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचा आदर्श घेतला पाहिजे.’ असे प्रतिपादन डीआरडीओ तथा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (संरक्षण, संशोधन आणि विकास संघटना) चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर यांनी केले.
        भारताचे थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९३ व्या जयंती निमित्त पंढरपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मध्यवर्ती असलेल्या खुल्या रंगमंचावर ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जागतिक विद्यार्थी दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी सदस्य त्याचबरोबर, स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एन. बी. पासलकर हे होते. याप्रसंगी थोर शास्त्रज्ञ तथा भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र गीत, स्वेरी गीतानंतर प्रास्तविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जागतिक विद्यार्थी दिन’ याबाबत माहिती देवून ‘देशभक्ती काय असते ती भारतरत्न डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्यातून दिसून येते. करिअरच्या उज्वलतेसाठी कोणतीही माहिती लक्षपूर्वक ऐका आणि बारकाईने पहा’ असा संदेश दिला. ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी म्हणाले की ‘डॉ. रोंगे सरांनी येथे रत्ने उभी केली आहेत. त्यामुळे विचारवंतांची कमतरता नाही. आपण एवढा प्रयत्न केला पाहिजे की डोक्यातून घाम आला पाहिजे.’ असे सांगून त्यांनी ‘ड्रीम फाउंडेशन’च्या  वाटचालीबाबत माहिती दिली. यावेळी डॉ. कमलेश पंडे यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी ड्रीम फाउंडेशन, आचार्य चाणक्य गुरुकुल आणि डॉ.कलाम कौशल्य विकास केंद्र, पुणे यांच्यातर्फे ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक अशोक कोर्टीकर, पंढरपुरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डी.वाय. ओंबासे व शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्धल स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे या तिघांना ‘राष्ट्र उभारणी प्रेरणा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. एन. बी. पासलकर म्हणाले की, ‘माझ्या जीवनात उद्योजक रतन टाटा आणि डॉ. अब्दुल कलाम सर यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यांनी आपल्या कार्यामध्ये टीमवर्क काय असते ते दाखवून दिले. टीमवर्कमध्ये एकमेकांस समजून, चर्चेद्वारे कार्य केल्यास सकारात्मक यश मिळते. त्यामुळे आपल्याबरोबरच देशाची देखील प्रगती होते. म्हणून स्वप्न सत्यात उतरण्यासाठी कार्यात सातत्य ठेवा.’ असेही त्यांनी सांगितले. यावेळी गौरी महाजन, मंजुश्री नायकुडे व आशिष शिंदे या विद्यार्थ्यांनी आज आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर सत्रात सर्वोत्तम प्रतिक्रिया दिल्यामुळे त्यांना ड्रीम फौंडेशन तर्फे पुस्तके खरेदी करण्यासाठी रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली. यावेळी बी.ए.आर.सी.चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.व्ही. के. सुरी, डॉ.विजय कुलकर्णी, विवेक वर्धिनी प्रशालेचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र पाराध्ये, बिटरगावचे सरपंच बाबासाहेब धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते देविदास कसबे, गणेश यादव, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त बी. डी.रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी.मनियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही. मांडवे, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
चौकट- 
शास्त्रज्ञ डॉ. नगरकर यांच्या मागणीनुसार स्वेरीच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी पाच गुंठे जमिनीची मागणी केली असता डॉ. रोंगे सरांनी ती मागणी तात्काळ मान्य केली. आता ‘येथून पुढे या स्वेरीच्या पाच गुंठ्यामध्ये संशोधनाचे कार्य स्वतंत्रपणे सुरु होईल.’ अशी घोषणा स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *