दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्माजी गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी स्वतंत्र सैनिक पुरुषोत्तम बाबुराव आडवळकर यांच्या निवासस्थानी वरील थोर पुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्वातंत्र्य सेनानी आढवळकर यांचे चिरंजीव श्री मिलिंद आडवळकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्माजी गांधी व त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी पा. तू. उत्पात यांचे चिरंजीव श्री सुनील उत्पात यांचे शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले व वरील थोर नेत्यांच्या सन्मानार्थ भजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागनाथ आदरराव व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भाळवणकर अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अशपाक भाई सय्यद युवराज फरकंडे काँग्रेस नेते देवानंद इरकल रशीद मनेरी सतीश रोकडे शकील मुल्ला संतोष ताटे इत्यादी काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.
