Uncategorized

‘आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे सामान्य रुग्णालय’ नामकरण करा

महर्षी वाल्मिकी संघाने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात लावला नामकरणाचा फलक पंढरपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयाचं नाव ’आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे सामान्य रूग्णालय’ असं करण्यात आलंय. महर्षी वाल्मिकी संघाने याची घोषणा करत रूग्णालयावर या नावाचा नामफलकही लावला. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात ज्या ठिकाणावरुन इंग्रजांनी अटक केली होती. त्याच्याच कांही अंतरावर असलेल्या एका चौकास […]

Uncategorized

सिंहगडच्या आरती शेळकेची ३ मल्टिनॅशनल कंपनीत निवड

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पंढरपूर येथील कुमारी आरती राजकुमार शेळके हिची ३ वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी यांनी दिली. कोर्टी येथील सिंहगड काॅलेज मधील अनेक विद्यार्थी वेगळ्या नामांकित कंपनीत निवडले जात आहेत. काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेली कुमारी आरती राजकुमार […]

Uncategorized

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’ दिवशी बेस्ट फार्मासिस्ट पुरस्काराने सन्मानित

सांगोला : बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई बीड, असोसिएशन ऑफ फार्मसी प्रोफेशनल महाराष्ट्र स्टेट ब्रँच,वेस्ट इंडिज इंटरनॅशनल ब्रँच आणि एपीपी मॉलिक्युलर फार्माकॉलॉजि डिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडो-मलेशियन इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये  फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस यांना बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ अंबेजोगाई संस्थेचे सचिव मा राजकिशोर मोदी यांच्या हस्ते बेस्ट फार्मासिस्ट  पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले. डॉ. एस के बैस यांना एकूण ३२ वर्षाचा टिचिंगचा अनुभव असून आत्तापर्यंत त्यांनी ४२ रिसर्च पेपर्स, ६ रिव्हिव्ह आर्टिकल, ९ रिसर्च पब्लिकेशन इन स्कोपस इंडेक्सइड जर्नल्स, ४ पोस्ट पी एचडी पब्लिकेशन, तसेच  त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम फार्मसीच्या १४ विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. ५ विद्यार्थी  त्यांच्या मार्गदर्शनाखाली  पी एचडी करीत आहेत. त्यांची ५  पुस्तके प्रकाशित आहेत, १ पेटंट फाईल, १ स्टार्टप नोंदणी,५ पोस्टर प्रेसेंटेशन, आत्तापर्यंत ४० ट्रैनिंग अटेंड केले आहेत. ५ ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून आमंत्रण, डी बाटु विद्यापीठाचे पी एचडीचे अधिकृत गाईड म्हणून मान्यता, डी बाटु विद्यापीठाचे प्रोफेसर व प्राचार्य म्हणून त्यांना  मान्यता मिळाली आहे. त्यांना एम फार्मसीमध्ये सेकंड टॉपर म्हणून सिल्वर मेडल मिळाले आहे.  डॉ बैस हे इंडियन फार्मासिस्ट असोसिएशन न्यू दिल्लीचे लाईफ टाईम मेंबर, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर ऑफ इंडियाचे लाईफ टाईम मेंबर, रजिस्टर्ड फार्मासिस्ट महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे मेंबर तसेच त्यांना बेस्ट रिसर्चर म्हणून २००० चा अवॉर्ड, २०२० चा नॅशनल एज्युकेशनल अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड  तसेच ‘बेस्ट प्रिंसिपल ऑफ दी इयर २०२२’चा  बहुमान  आणि आता बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई बीड यांच्या तर्फे बेस्ट फार्मासिस्ट  पुरस्कार  मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी समाधान व्यक्त केले. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी प्राचार्य डॉ. संजय बैस यांचे अभिनंदन केले.  

Uncategorized

डाँ.हरी भोसले यांना व्यसनमुक्ती-मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार प्रदान

समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रिफिल हेल्थ प्रो.प्रा.लि. व जनरल हॉस्पिटल कोल्हापूर यांचे कडून दिला जाणारा व या संस्थेचे सर्वेसर्वा श्री.सादिक शेख साहेब, संचालक सुहास पाटील, अस्लम शेख साहेब, निवासी व्यसनमुक्ती हाँस्पीटलचे डॉ सागर देसाई आणि त्यान्चे सर्व संचालक मंडळ यांनी डॉ हरी भोसले सर यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती-मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार काल 11 […]

Uncategorized

भोंदू बाबाने डोक्यावरून लिंबू फिरविला आणि केला तरुणीवर अत्याचार

पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धेचा खेळ सुरूच   साताऱ्यात जादूटोणा करून अत्याचाराचा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे.सातारा संशयिताने तरूणीला रुममध्ये नेऊन तिच्या डोक्यावर लिंबू फिरवलात्यामुळे तिला भोवळ आली. त्यानंतर त्याने जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तरूणीने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी साताऱ्यातील शाहुपुरी पोलिसांनी मुक्तार शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून मुक्तार नासीर शेख याला ताब्यात […]

Uncategorized

प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा कॅप राऊंड शनिवार पासून सुरु

२३ ऑगस्ट पर्यंत चालणार प्रक्रिया  ‘शै. वर्ष २०२२-२०२३ साठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाची  पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) शनिवार, दि. २० ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया  मंगळवार, दि.२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:००  वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत स्वेरी डिप्लोमाच्या  फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६४३७) मध्ये ऑनलाईन कॅप राउंड साठी ऑप्शन फॉर्म भरण्याची […]

Uncategorized

स्वेरीच्या सलेहा मिरजकर यांची ‘प्रसीवा लिमिटेड’ या कंपनीत निवड

‘प्रसीवा लिमिटेड’या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सलेहा सलीम मिरजकर यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.        पुणे येथील ‘प्रसीवा लिमिटेड’ या मल्टीनॅशनल कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम […]

Uncategorized

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मागितली 10 लाखांची खंडणी

दोघांना अटक   अंधेरीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहारा पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  कांदिवली परिसरात राहणारे व्यापारी सहार पोलिस […]

Uncategorized

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल नाराजी

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय सातत्याने चर्चेत राहिले आहे.या ठिकाणी शासनाकडून अनेक आधुनिक उपचार प्रणाली,रुग्णांचा तपासणीसाठी महागडी उपकरणे उपलब्ध करून दिलेले असतानाही या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना अनेकदा विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.सोमवारी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीरावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,माउली हळणवर यांनी खा.जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या समोरच तक्रारीचा पाढा वाचला […]

Uncategorized

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स काळाची गरज

सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये उद्योग क्षेत्रातील अनेक मोठया शहरामध्ये विद्यार्थ्यांच्या बुध्दीच्या विकासाकरीता अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स सारख्या नवीन अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे. या अभ्यासक्रमाचा वापर येणाऱ्या पुढील काळासाठी खुप मोठया प्रमाणावर होणार आहे. त्याअनुषंगाने या क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध […]