पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाला असून ६ कोटी ४५ लाख ४८ हजार ५१४ विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार आहे मंगळवेढा तालुक्यातील १००४ शेतकऱ्यांनी या फळ पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता त्या शेतकऱ्यांनी एकूण ७५२ हेक्टर क्षेत्रावर हा फळ पिक विमा भरला होता यामध्ये द्राक्षासाठी ३०५ शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांना १ कोटी ८९ लाख २४ हजार २२७ रुपये मंजूर झाले आहेत आंबा उत्पादक ३५ शेतकऱ्यांना ४ कोटी ४९ लाख ४२ हजार ८३८ रुपये तर डाळिंब उत्पादक ६६४ शेतकऱ्यांना ४ कोटी ४९ लाख ४२ हजार ८३८ रुपये मंजूर झाले आहेत असा एकूण १००४ शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील आंबे बहार फळपीक विमा मंजूर झाला असून ही मंजूर रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Related Articles
खायचं असेल तर खा; मटणाच्या ग्रेव्हीचा वाद टोकाला; हॉटेल मालकाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
मटणाची ग्रेव्ही चांगली नसल्याची तक्रार केल्याने झालेल्या वादातून हॉटेल चालकाने शटर बंद करून तिघा पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये ही घटना घडली. कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील कर्मचारी किरण साबळे व त्यांचे दोन सहकारी यांच्यासोबत ही घटना घडली […]
वै.ह.भ.प.वासुदेव महाराज चवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त २३ मार्च पासून पंढरीत भागवत कथा,नामजप व हरिनाम सप्ताहाचे आयोजन
वै.ह.भ.प.वासुदेव महाराज चवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पंढरीत भागवत कथा,नामजप व हरिनाम सप्ताहाचे बुधवार दिनांक २३ मार्च ते ३० मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले असून श्री विठ्ठल रुक्मिणी कृपेने,श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर महाराज,वै. प.पु.हनुमंत बाबा व वै.प.पु.पंढरीनाथ चवरे यांच्या आशीर्वादाने पार पडत असलेल्या या सप्ताह सोहळ्यात कलशपूजन प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते,दीपप्रज्वलन मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या […]
जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे
‘हर घर नल से जल’ हा संकल्प घेऊन सरकारने जल जीवन मिशन योजना राबविली आहे या योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ६५ लाख इतका निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. या निधी मंजूर झालेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना अधिक स्वरूपात सुलभ […]