430 किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 430 किलो भेसळयुक्त चहा पावडर मुंबईतील शिवडी बंदर रस्त्यावर पोलिसांनी छापेमारी जप्त केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दोन आरोपींना आज अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्याची पोलिस कोठडी मागण्याची […]
निविदा सूचना
विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून दोन खासगी क्लासेस चालकांत वाद
कोणत्या गोष्टीवरुन जगात वाद होतील याचा काही नेम नाही. बीडमध्ये फिजिक्स विषयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून दोन खासगी क्लासेस चालकांत वाद झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, हा वाद एवढा विकोपाला पोहचल्यानंतर एकाने चक्क डोक्यावर पिस्तुल रोखल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. हर्षल केकाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांत दोघा क्लासेस चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. […]
पंढरपुरात भेसळयुक्त दूध घेऊन येणाऱ्या टेम्पोवर अन्न विभागाची कारवाई
०३/०२/२०२१ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना सांगली जिल्ह्यातून एक निळ्या रंगाचा आयशर टेम्पो क्रमानं एम एच ०९ सी यू ०००७ भेसळ केलेले दूध घेऊन पंढरपूर येथे येणार असल्याच्या प्राप्त गोपनीय माहिती नुसार मे. साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर ली या पेढीची तपासणी केली. सदर पेढी गोपनीय माहितीनुसार सदर भेसळीचे दूध स्वीकारत असल्याचे दिसून […]
सावधान! तुमच्या कार्डचे होवू शकते क्लोनिंग
मुंबई, 26 जानेवारी : मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून कार्ड क्लोनिंगचे प्रकार वाढले आहे. सध्या मुंबईत ओटीपी, कार्डची माहिती तसंच बॅंक खात्यांची माहिती चोरुन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. आता नव नवीन पद्धत वापरुन कार्ड क्लोनिंग करून कार्डधारकांची फसवणूक होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. माहिम येथील जिमी हंसोटिया आणि मेहुल पटेल या दोन मुंबईकरांचे कार्ड क्लोनिंग […]
तर तुमचा वीजपुरवठा खंडित होणार
मुंबई, 19 जानेवारी : लॉकडाऊन काळात वीज सवलत देण्याची भाषा करणाऱ्या उर्जा मंत्रालयाने आता ग्राहकांना इशारा देत वीजबिल वसुलीची मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. थकबाकी वसूल करण्याचे आणि थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत. ‘डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे […]
बाभुळगावच्या शेतकऱ्याच्या गोठयातून म्हशी लंपास
थंडीचा कडाका वाढत चालला कि चोरीच्या घटना वाढतात हे जणू समीकरणच आहे.रात्री लवकरच शुकशुकाट होत असल्याचा फायदा चोरटे उचलत असून गेल्या काही दिवसात पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत व यात चोरटयांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे दिसून आले.दिनांक १९ डिसेंबरच्या मध्यरात्री पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथील […]
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 10 : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार […]
आयुर्वेदिक डॉक्टरांना ऑपरेशन करण्याची मुभा देण्याच्या निणर्याविरोधात शुक्रवारी दवाखाने बंद
केंद्र सरकारने नुकताच आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या निर्णय घेतला असून त्यामुळे देशभरातील अलोपॅथिक डॉक्टर संतप्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय एम ए) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले असतानाच या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या 219 शाखांमधील 45000 डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असलेले एकूण 1 […]
राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.१०: राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री श्री. टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले. दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून […]
मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी
मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी मुंबई, दि. ४ : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष […]