ताज्याघडामोडी

ड्युटीवर निघाली पण पोहोचलीच नाही, २६ वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू

बुलढाणा येथील नियमित ड्युटीवर जाणारी तरुणी बेपत्ता झाली. प्रचंड काळजीत पडलेल्या घरच्या मंडळींना अचानक मेसेज मिळाला की तुमची मुलगी रेल्वेतून पडून मृत्यू पावली. आधी कुटुंबीयांचा यावर विश्वास बसत नव्हता. परंतु सत्य समोर आल्यावर कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला. ही दुर्दैवी घटना बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथे घडली. पूर्णिमा दिनकर इंगळे (वय वर्ष २६) असे मृत तरुणीचे नाव […]

ताज्याघडामोडी

आई आता मी कसं जगू, माझं कसं होणार, लेक हंबरडा फोडत कोसळताच सर्व संपलं, आईच्या पार्थिवावर मुलीनं प्राण सोडला

जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा येथे शुक्रवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आईचं निधन झाल्यानं माहेरी आलेल्या लेकीनं आईच्या पार्थिवाजवळच प्राण सोडले. एकाच घरात एकाच दिवशी दोन जणांचं निधन झाल्यानं शेवाळकर आणि जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. जयमाला जाधव या त्यांच्या आई गयाबाई शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळताच माहेरी आल्या होत्या. आईच्या मृत्यूनंतर हंबरडा फोडत […]

ताज्याघडामोडी

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा; सिलिंडर दरात मोठी घट; पाहा नवे दर

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्याच दिवशी लोकांना दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेच बदल झालेले नाहीत. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात केंद्रानं घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली होती. या महिन्यात घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. पण व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर कमी […]

ताज्याघडामोडी

ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन जात असताना अचानक झाला ब्रेक फेल, तरुण ट्रॉलीखाली दबला

शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे शेतातून कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून घरी घेऊन जात असताना ट्रॅक्टरच्या ब्रेक फेल होऊन ट्रॅक्टर उलटल्याने तरुण ट्रॅक्टर खाली अडकला गेला. त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेने मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेने रणदिवे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. भूषण विजय […]

ताज्याघडामोडी

शिंदे गटातील ४० पैकी २८ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

आगामी काळात शिंदे गटातील ४० आमदारांपैकी २८ जण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तविले आहे. बेरोजगारी, महागाई आणि अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, लोकं प्रचंड चिडली आहेत. ते मतदान करण्याची संधी कधी मिळेल, याची वाट पाहत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये […]

ताज्याघडामोडी

रोहित पवारांना निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनी अनेकांना निरोप धाडले होते; नरेश म्हस्केंचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र क्रिकेट असोिसएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली होती, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. रोहित पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात अभिषेक बोके (पवार यांच्या भगिनीचे नातू) हे निवडणुकीच्या मैदानात होते. परंतु, रोहित पवार यांनी क्लब वर्गातून सर्वाधिक मतं मिळवत विजय […]

ताज्याघडामोडी

घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, थंड पेयात गुंगीचे औषध देत १७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

एका १७ वर्षीय पीडित मुलाला बाहण्याने लॉजवर नेऊन ४० वर्षीय नराधमाने पीडित मुलाला थंड पेयात गुंगीचे औषध देऊन अनैसगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड आली आहे. याप्रकरणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नरधामावर पोक्सोसह अनैसगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रितेश दुसाने असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. धक्कादायक घटनेबाबत पोलीस […]

ताज्याघडामोडी

चार वर्षांपूर्वी पतीचा एन्काऊंटर, आता पत्नीचं टोकाचं पाऊल; तळहातावर २ ओळी लिहून जीवनाची अखेर

उत्तर प्रदेशच्या झाशीमधील चर्चेत असलेल्या पुष्पेंद्र यादव एन्काऊंटर प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची बातमी आज समोर आली आहे. २०१९ मध्ये एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या पुष्पेंद्र यादव यांची पत्नी शिवांगीनं आज गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना शिवांगीच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळली. शिवांगीनं आत्महत्येसाठी स्वत:ला जबाबदार धरलं आहे. जालौनच्या कालपी तहसीलमधील पिपराया गावात वास्तव्यास असलेल्या राकेश यादव […]

ताज्याघडामोडी

मार्चचा शेवटही पावसानेच! राज्यातील या जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटही झाली. ज्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशातच आता पावसासंदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यानुसार आता मार्चचा शेवटही अवकाळी पावसानेच होणार आहे. 30 आणि 31 मार्च तसंच 1 एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये […]

ताज्याघडामोडी

आशिष कुठेय? आई-वडील जीव तोडून धावले; लिफ्टच्या आत डोकावून पाहिले; लेकराचे पाय लटकत होते

पश्चिम दिल्लीतील विकासपुरीत एका पाच मजली इमारतीत नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना २४ मार्चला घडली. लिफ्टच्या गेटमध्ये अडकल्यानं मुलाचा मृत्यू झाला. गेटमध्ये अडकल्यानं मुलगा गंभीर जखमी झाला होता. गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना आता समोर आली आहे. मुलाचं नाव आशिष असं आहे. आशिष त्याच्या आई वडिलांसोबत सीतापुरीमध्ये राहायचा. त्याचे आई वडील […]