गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेमप्रकरणातून एका युवकाची कोयत्याने वार करून हत्या

नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून एका युवकाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत नामक मुलगा नवी मुंबईतील तळवली भागामध्ये राहत होता. या दरम्यान अनिकेतची एका मुलीशी ओळख झाली होती. त्यांच्यात बोलणं देखील सुरु झालं. मात्र मध्यंतरी कोरोना आला आणि अनिकेत आपल्या घरी नाशिकला राहायला गेला. या काळात अनिकेतच्या ओळखीच्या अनिल शिंदे याची त्याच मैत्रिणीशी ओळख […]

ताज्याघडामोडी

वीज कनेक्शन कट करण्यास महावितरणची सुरुवात 

वीज बिल थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या महावितरणने आता थकबाकीदारांना झटका देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसात भांडूप परिमंडळातील 6 हजार 602 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे. वीज बिलाची थकीत रक्कम भरल्यानंतरच वीज जोडणी दिली जाईल अशी भूमिका महावितरणने घेतल्याने वीज बिल थकबाकीदार ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत. महावितरणच्या भांडूप परिमंडळात भांडूप, […]

ताज्याघडामोडी

शनिवार-रविवारला जोडून पुन्हा बँक कर्मचारी दोन दिवस संपाच्या तयारीत 

खासगीकरणाच्या विरोधात सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे मार्चमध्ये बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडतेवेळी आणखी दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे. याविरोधात सरकारी बँकांच्या (PSBs) के कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 15 आणि 16 मार्च या दोन दिवसांसाठी संपावर जाण्याचा निर्णय […]

ताज्याघडामोडी

धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी ना.रामदास आठवले मोदींना भेटणार 

धनगर समाजाला बिहार, झारखंड आदी राज्यात एस. टी. चा दर्जा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात केवळ ‘स्पेलिंग मिस्टेक मुळे धनगरचे ‘धनगड’ झाले असून महाराष्ट्रात धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे. तसेच दिल्लीत पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावे यासह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सामाजिक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यात तरुणीची आत्महत्या 

हडपसर-महंमदवाडी येथे रविवारी रात्री एका सोसायटीच्या इमारतीवरुन पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी मारुन आत्महत्या केली. राज्यातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी भाजप पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष नगरसेविका अर्चना पाटील व भाजप युवा सरचिटणीस सुशील मेंगडे यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आर्थिक फसवणूक झाल्याने सराफाची आत्महत्या

सांगलीत सराफाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफाची फसवणूक झाली. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे, पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफ हरीशचंद्र खेडेकर यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सराफ हरीशचंद्र खेडेकर (वय 82) यांनी […]

ताज्याघडामोडी

”त्या” महाराजाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना,७२ तास उलटूनही महाराज बेपत्ताच

विनयभंगाचा आरोप फेटाळून लावत व्हिडिओद्वारे तसेच सुसाईट नोटमधून थेट आत्महत्येचा इशारा देणारे सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे (२०) हे गेल्या चार दिवसापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक शोध घेत असून तरीही त्यांचा शोध लागत नसल्याने विनयभंग प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.       गेवराई तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे हे विनयभंग, बाललैंगिक […]

ताज्याघडामोडी

फास्टॅगच्या नियमात ‘मोठा’ बदल

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅमध्ये किमान रक्कम ठेवण्याची अट समाप्त केली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये आणि फास्टॅगचा वापर वाढावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. फास्टॅग वॅलेट काढतेवेळी डिपॉझिट ठेवले जाते. त्याच बरोबर वाहन धारकाला किमान रक्कम ठेवण्याची अट बॅंकाकडून घालण्यात येत आहे. आता किमान रकमेची अट रद्द करण्यात आली आहे. प्राधिकरणाने म्हटले […]

ताज्याघडामोडी

एफआरपी थकवलेल्या साखर  कारखान्याचे संचालक ठरणार सरकारी थकबाकीदार ?

राज्यात साखर कारखाने सुरू होऊन 4 महिने उलटून गेले. तरीही राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील उसाची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम न देता मोडतोड करून शेतकर्‍यांना रक्कम दिलेली आहे. तसंच गतवर्षीची एफआरपीची रक्कम अद्यापही काहींनी दिलेली नाही. या सर्व साखर कारखान्यांवर तातडीने साखर जप्तीची कारवाई करावी,’ अशी मागणी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

देवकार्य करण्याचा बहाणा करून महिलेचा निर्घृण खून

देवकार्य करण्याचा बहाणा करत सोने लुटण्याच्या हेतून कोल्हापुरात 80 वर्षाच्या महिलेचा जाळून मृतदेह कापून निर्घुण खून केल्याची घटना आज सकाळी कोल्हापूरच्या राजराम तलाव परिसरात घडली होती. या खून प्रकरणाचा तापस आव्हानात्मक होता मात्र कोल्हापूर पोलिसांनी शिताफीने तपास करत छिन्न विच्छिन्न मृतदेहाची ओळख पटवली. शांताबाई शामराव आगळे या 80 वर्षीय मृत महिलेचं नाव असून या खून […]