ताज्याघडामोडी

धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी ना.रामदास आठवले मोदींना भेटणार 

धनगर समाजाला बिहार, झारखंड आदी राज्यात एस. टी. चा दर्जा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात केवळ ‘स्पेलिंग मिस्टेक मुळे धनगरचे ‘धनगड’ झाले असून महाराष्ट्रात धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे. तसेच दिल्लीत पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावे यासह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिले.

डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आज धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ना. रामदास आठवले यांच्या पुढाकारातून बैठक आयोजित करण्यात आली होती. धनगर समाजाचा देशात अनेक राज्यात एस टी अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत केला आहे.

अनुसूचित जातीच्या यादीत 36 क्रमांकावर महाराष्ट्रात धनगर समाजाचा उल्लेख ‘धनगड’ असा आहे. मात्र महाराष्ट्रात धनगड समाजाचा एकही व्यक्ती नाही. केवळ स्पेलिंग चुकले म्हणून धनगरचे धनगड केलेले आहे. त्यामुळे मागील 70 वर्षांपासून महाराष्ट्रातील धनगर समाजाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मागील सरकार मधील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयात महाराष्ट्रातील धनगड आणि धनगर हे एकच असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्या आधारावर महाराष्ट्रात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी खासदार विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्यावतीने केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *