ताज्याघडामोडी

शनिवार-रविवारला जोडून पुन्हा बँक कर्मचारी दोन दिवस संपाच्या तयारीत 

खासगीकरणाच्या विरोधात सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे मार्चमध्ये बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडतेवेळी आणखी दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे. याविरोधात सरकारी बँकांच्या (PSBs) के कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 15 आणि 16 मार्च या दोन दिवसांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी म्हणजे 13 मार्च रोजी महिन्याचा दुसरा शनिवार आणि 14 मार्च रोजी रविवार असल्यानं बँका बंद राहतील.

मात्र या संपाच्या चर्चेने सामान्य जनतेमध्ये मात्र नाराजी असून नेमके शनिवार-रविवारला जोडून बँक कर्मचारी संप करतात आणि सुट्टीचा आनंद घेतात त्याच वेळी सामान्य जनतेचे अर्थकारण मात्र ठप्प होते.हे कर्मचारी संघटित असल्याने शासन यांच्या दबावापुढे झुकते व कारवाई करत नाही अशीच भावना व्यक्त होताना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *