ताज्याघडामोडी

”त्या” महाराजाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना,७२ तास उलटूनही महाराज बेपत्ताच

विनयभंगाचा आरोप फेटाळून लावत व्हिडिओद्वारे तसेच सुसाईट नोटमधून थेट आत्महत्येचा इशारा देणारे सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे (२०) हे गेल्या चार दिवसापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक शोध घेत असून तरीही त्यांचा शोध लागत नसल्याने विनयभंग प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.      

गेवराई तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे हे विनयभंग, बाललैंगिक प्रतिबंध कायदा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाल्याने चर्चेत आहेत. चकलांबा ठाण्यात एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. ७ फेब्रुवारी रोजी हनुमान महाराजांनी अज्ञातस्थळी बाभळीच्या झाडाखाली बसून व्हिडिओ तयार केला. त्यात त्यांनी आरोप फेटाळून लावत त्यांनाच पाच लाखांसाठी ब्लॅकमेल केले जात असल्याचा दावा केला.

त्यानंतर सुसाईट नोट लिहून आत्महत्येचा इशारा दिला. या नोटमध्ये दहा जणांच्या नावाचा उल्लेख केला होता. सुसाईट नोट व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चकलांबा पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. ते वाणगाव फाटा (ता.बीड) येथे असल्याचे तांत्रिक तपासात समोर आल्यावर नेकनूर पोलिसांनीही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ७२ तास उलटूनही महाराजांचा थांगपत्ता लागला नाही. हनुमान महाराज हे सुखरुप असून दुसऱ्याच्या मोबाइलवरुन कुटुंबातील लोकांशी त्यांचे बोलणे झाल्याची चर्चा गेवराई परिसरात होत परिसरात होत असल्याचे समजते. ते पंढरपुरातील एका मठात आहेत व त्यांचे कुटूंबाशी बोलणेही झाले असल्याची चर्चा होत असतानाच मात्र तेथील स्थानिक पोलिसांकडून मात्र या बाबत कुठलाही दुजोरा देण्यात आला नसल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *