गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यात तरुणीची आत्महत्या 

हडपसर-महंमदवाडी येथे रविवारी रात्री एका सोसायटीच्या इमारतीवरुन पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी मारुन आत्महत्या केली. राज्यातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी भाजप पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष नगरसेविका अर्चना पाटील व भाजप युवा सरचिटणीस सुशील मेंगडे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देऊन बुधवारी केली.

संबंधित युवती नुकतीच पुण्यात एका क्‍लासच्या निमित्ताने राहण्यास आली होती आणि अचानक तिने आत्महत्या केली. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *