गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आर्थिक फसवणूक झाल्याने सराफाची आत्महत्या

सांगलीत सराफाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफाची फसवणूक झाली. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे,

पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफ हरीशचंद्र खेडेकर यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सराफ हरीशचंद्र खेडेकर (वय 82) यांनी त्यांच्या दुकानातच गळफास घेत आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आठ जणांची नाव ठेवली लिहून होती. त्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मधुकर खेडेकर, श्रीकांत उर्फ बाळू खेडेकर, सदानंद खेडेकर, प्रकाश खेडेकर, राजू शिरसाट, वैभव पिराळे, दिवाकर पोतदार, सुनिल पंडित यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी मृत खेडेकर यांची मूलगी तेजस्विनी बेलवलकर यांनी तक्रार दिली आहेअव्वाच्या-सव्वा व्याज लावून कर्जही वसूल केले. या व्यवहारातून खेडेकर यांनी मानसिक त्रास देऊन धमकी दिल्याने त्यांनी अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *