गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जिच्यासाठी घर सोडलं, तिनंच संपवलं; कारण ठरले फोन कॉल

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीनं तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. लखीमपूर खिरीतील चमरुआ गावात १ जूनला एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रेयसीनंच प्रियकराची गळा दाबून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. लखीमपूर खिरीतील चमरुआ गावात दोन […]

ताज्याघडामोडी

सावकाराने ३ हजारांसाठी हात मोडला, मजूर पोलिसांत गेला म्हणून जिवानिशी मारलं

माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना लातूर येथे घडलीय. केवळ ३ हजाराच्या कर्जासाठी सावकाराने दलित मजुरासह (कर्जदार) संपूर्ण कुटुंबाला अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कर्जदाराचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. रेणापूर येथील रहिवाशी असलेले गिरिधारी केशव तपघाले (वय ५०) मजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते. कधी हाताला काम […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर ची इ. १० वी १००% निकालाची परंपरा कायम

शैक्षणिक वर्ष २०२२-२३  मध्ये घेण्यात आलेल्या १० वी एस.एस.सी. परीक्षेचा निकाल आज दिनांक ०२.०६.२०२३ रोजी जाहीर झाला. पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेचा दर वर्षी प्रमाणेच इयत्ता दहावीचा १००% निकाल लागला.एकूण 45 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. यामध्ये कुमार मयुरेश जाधव 93.60 % गुण मिळवून प्रशालेत सर्वप्रथम,कु.हर्षदा काळे 92.00%  गुण मिळवून प्रशालेत द्वितीय तर कांचन लिंगे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नानंतर २० दिवसात बायकोचं अफेअर समजलं; ना खूनखराबा ना शोरशराबा, नवऱ्याचा मोठा निर्णय

लग्नानंतर अवघ्या २० दिवसात पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्यास परवानगी दिली. महिलेची आपल्याशी बळजबरीने लगीनगाठ बांधण्यात आलीये, तिचे दुसऱ्याच पुरुषावर प्रेम आहे, याची जाणीव होताच पतीने हे पाऊल उचलले. झारखंडमधील पालमू जिल्ह्यातील बिचकिला गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ही घटना वाचून अनेकांना ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाची आठवण झाली मनतू पोलीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मित्रांमध्ये भांडणाचा भडका, मित्राचे वडील समजवायला आले त्यांच्यावर गोळीबार

नांदेड शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरलं आहे. शुल्लक कारणावरून एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या आपल्या मित्राच्या वडिलांवर गोळी झाडली. गोळी कमरेला लागल्याने तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगर येथे ही घटना घडली. साहेबराव जोगदंड असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.या घटनेनंतर पारिसरात खळबळ उडाली होती. जखमी […]

ताज्याघडामोडी

भावाच्या वाढदिवसाला आल्या; दोन सख्ख्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू

पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंचरजवळ असलेल्या एकलहरे गावच्या हद्दीत घोडनदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान ही घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरती शाम खंडागळे (वय १८) आणि प्रीती श्याम खंडागळे (वय १७, दोघी रा. मुंबई […]

ताज्याघडामोडी

आठवडाभरापासून शेतकरी बेपत्ता, अचानक मृतदेह सापडला; धक्कादायक कारण समोर

राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतेच साताऱ्यातून हत्येचं एक प्रकरण समोर आलं आहे. फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी येथून आठवडाभरापासून एक व्यक्ती बेपत्ता होता. त्याचा आता मृतदेह सापडला आहे. त्या व्यक्तीचा खून झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. लोणंद पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. सचिन धायगुडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. याबाबत […]

ताज्याघडामोडी

OBC कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण; सरकारडून समिती स्थापन

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारने मोठं पाऊल टाकल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती स्थापन झाली आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांची नोंद इतर मागासवर्गात होईल. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती स्थापन झाली आहे. पुढील 3 महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.  निजामाच्या काळापासूनची कागदपत्रं, […]

ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी येणार निकाल, इथे पाहता येणार

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालानंतर इयत्ता दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान, दहावीच्या निकालासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच १ ते ५ जून दरम्यान दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना […]

ताज्याघडामोडी

ज्या शाळेत शिकत होती तिथेच विद्यार्थिनीसोबत घडलं भंयकर, पोलीसही झाले हैराण

अयोध्येतील कँट पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सनबीम शाळेमध्ये एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थिनी दहावीत शिकत होती. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, सुट्टी असूनही तिला शाळेतून फोन करून बोलावण्यात आले. शाळेत पोहोचल्यानंतर काही वेळातच ती झुल्यावरून खाली पडून जखमी झाल्याची माहिती मिळाली. नातेवाईक रुग्णालयात पोहोचल्यानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थिनी शाळेच्या छतावरून खाली पडताना […]