ताज्याघडामोडी

ज्या शाळेत शिकत होती तिथेच विद्यार्थिनीसोबत घडलं भंयकर, पोलीसही झाले हैराण

अयोध्येतील कँट पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सनबीम शाळेमध्ये एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थिनी दहावीत शिकत होती. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, सुट्टी असूनही तिला शाळेतून फोन करून बोलावण्यात आले. शाळेत पोहोचल्यानंतर काही वेळातच ती झुल्यावरून खाली पडून जखमी झाल्याची माहिती मिळाली.

नातेवाईक रुग्णालयात पोहोचल्यानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थिनी शाळेच्या छतावरून खाली पडताना दिसत आहे. त्यामुळे कुटुंबाने आपल्या मुलीसोबत काहीतरी वाईट घटना झाल्याचा संशय व्यक्त केला असून ही हत्या असल्याचा आरोप केला आहे.

26 मे रोजी सकाळी 8.45 च्या सुमारास दहावीत शिकणारी अनन्या घरापासून काही अंतरावर असलेल्या तिच्या शाळेकडे निघाली. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतून फोन आल्यानंतर ती शाळेत गेली होती. 10 वाजण्याच्या सुमारास त्यांना अनन्या शाळेच्या झुल्यावरून खाली पडली आणि तिला दुखापत झाल्याचा तिच्या घरच्यांना फोन आला. रुग्णालयात नेल्यानंतर अनन्याचा मृत्यू झाला.

अनन्याच्या शरीरावरील जखमा पाहून तिच्या कुटुंबाने अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. दीड ते दीड फूट उंचीच्या झुल्यावरून पडलेली 10 वी ची विद्यार्थिनी एवढी जखमी कशी होऊ शकते असा सवाल कुटुंबीय आणि अनन्याचे नातेवाईक विचारत आहेत. जखमी अनन्याच्या चेहऱ्यावर, डोळ्यावर जखमा होत्याच सोबतच तिचा एक हात देखील वळलेला होता. यानंतर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून यात अनन्या शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडत असताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *