ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी येणार निकाल, इथे पाहता येणार

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालानंतर इयत्ता दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान, दहावीच्या निकालासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच १ ते ५ जून दरम्यान दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना एसएमएस आणि डिजीलॉकरच्या माध्यमातून आपला निकाल पाहता येऊ शकतो.

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता. राज्यभरातील ५ हजार ०३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

कुठे पाहाता येईल निकाल?

– सर्वात प्रथम Mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या संकेतस्थळांना भेट द्या.

– संकेतस्थळावर जाताच इयत्ता दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

– तिथल्या बॉक्समध्ये तुमचा हॉल तिकीट क्रमांक टाका.

– त्यानंतर तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरे लिहा.

– तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

– निकालाची प्रिंट काढा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *