गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जामिनावर सुटताच तुफान गोळीबार, हत्येच्या आरोपातील तरुणाची निर्घृण हत्या

जळगाव : भुसावळ तालुक्यातील नशिराबाद खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या एका संशयित आरोपीची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे आज (मंगळवारी) सायंकाळी साडेसात राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत. जळगावातून दुचाकीने भुसावळला जात होते धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय 19) असे या घटनेतील मृत तरुणाचे […]

ताज्याघडामोडी

1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंट पद्धतीत मोठे बदल; RBI हे नवे नियम लागू करणार

पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीममध्ये  मोठा बदल होणार आहे. नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम 1 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. या नियमानुसार, पेटीएम-फोन पे सारख्या बँका आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला प्रत्येक वेळी हप्ता (ईएमआय हप्ता) किंवा बिलाचे पैसे कापण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. एकदा परवानगी दिल्यावर प्रत्येक वेळी पैसे आपोआप कापले जाऊ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुन्ह्याच्या तपासात मदतीसाठी स्विकारली 10 हजारांची लाच; ASIसह पोलीस नाईक ताब्यात

अपघात प्रकरणी दाखल गुन्ह्यांत तपासात मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षकाने आरोपीकडे दहा हजार रूपयांची मागणी केली. तसेच ती लाच पोलीस नाईक कर्मचार्‍याच्या हस्ते घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले.अभिरूची पोलीस चौकीसमोर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. श्रीपती माणिक कोलते (वय 55, सहायक पोलीस उपनिरीक्षक) आणि शिवाजी बाळासाहेब जगताप (वय 34, पोलीस […]

ताज्याघडामोडी

पगार आणि बँकेतील पैशांसंदर्भातील नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार, तुमच्या खिश्यावर पडणार भार?

सप्टेंबर महिना पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यातच १ ऑक्टोबरपासून तुमच्या पगार आणि बँकेतील पैशांसंदर्भातील नियमांत मोठे बदल होणार आहेत. या नव्या नियमांमुळे तुमच्या पगारावर परिणाम होत बँकेत जमा होणारा पगार कमी होऊ शकतो. याशिवाय बँकेतील पैशांसंदर्भातील नियमात बदल होणार आहे. नेमके बँकेशी संबंधित नियमांत काय बदल होणार? यामुळे तुमच्या खिश्यावर भार पडणार […]

ताज्याघडामोडी

‘मला चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर’, मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची […]

ताज्याघडामोडी

हसन मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी गृहमंत्र्यांकडून मला अटकेचे आदेश- किरीट सोमय्या

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आपण विदर्भातील नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार होतो. शरद पवार यांना हे कळल्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगून माझा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भटुंबरे येथे अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे हद्दीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असली तरी येथून होणारी अवैध वाळू चोरी हा पोलीस प्रशासनास डोकेदुखी ठरला आहे असेच म्हणावे लागेल.काल शनिवार दिनांक 18/09/2021 रोजी रात्री ९ चे सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना भटुंबरे येथून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पतीला निलंबित केल्यानंतर महिलेचा जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जोरदार राडा

पतीला निलंबित केल्याने पत्नीने सीईओंच्या दालनात गोंधळ घातल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. जिल्हा परिषद सदस्य व नागरिकांच्या आलेल्या तक्रारीवरुन प्रशासनाने एका औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी संबंधित औषध निर्माण अधिकाऱ्याच्या पत्नीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ जिल्हा परिषदेमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सदर अधिकारी कोरेगाव तालुक्यातील […]

ताज्याघडामोडी

कोरोनाने पतीचा मृत्यू, विरहातून पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसह आत्महत्या, शिक्षक दाम्पत्याचा करुण अंत

कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षक पतीचा विरह सहन न झाल्यामुळे शिक्षिका असलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन महिलेने आपलं आयुष्य संपवलं. बीडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं? एक महिन्यांपूर्वी कोरोनाने शिक्षक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. पतीविरह सहन न झाल्याने शिक्षिका […]

ताज्याघडामोडी

मालिकेतून गौतम बुद्धांचा अवमान, निर्माते महेश कोठारे यांची जाहीर माफी

छोट्या पडद्यावरील एका मालिकेतून भगवान गौतम बुद्ध यांचा अवमान झाल्याने वाद निर्माण झाला होता. पण, त्यावर मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी माफी मागितली आहे.स्टार प्रवाह या वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेशी निगडीत हे प्रकरण आहे. या मालिकेतील एका व्यक्तिरेखेने भगवान गौतम बुद्धांचा चेहरा असलेली वेशभूषा केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता.त्या […]