ताज्याघडामोडी

पडळकरांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा वाढवा, फडणवीसांचं गृहमंत्र्यांना पत्र

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे. गोपीचंद पडळकर हे सध्या मुंबईत आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. […]

ताज्याघडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न प्रशासन सतर्क

हॉटेल, पेढे विक्रेते, मिठाई विक्रेते, चुरमुरे भत्ता विक्रेते, मेवा मिठाई विक्रेते, अस्थायी स्टॉल होल्डर या प्रामुख्याने वारी काळात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. तसेच भाविकांची वर्दळ असलेले भाग मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक, स्टेशन रोड, भक्त निवास, गजानन महाराज मठ सरगम चौक, कॉलेज चौक येथील किरकोळ विक्रेते व मोठे हॉटेल्स यांची सुद्धा […]

ताज्याघडामोडी

रुग्णांनाही बसणार महागाईची झळ, औषधांच्या किंमती 40 टक्क्यांनी महागल्या

ह्रदयरोग आणि मधुमेहावरील औषधांच्या किंमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झालीय. यासोबतच प्रतिजैविक औषधं तसंच टॉनिक आणि खोकल्याच्या औषधांच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्यानं रुग्णांना त्याचा फटका बसतोय. कोरोना व्हायरसमुळे औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक पुरवठा साखळीत अडथळा आला आहे. त्यामुळे भारतात पॅरासिटामॉलसह पेनकिलर, अँटीइन्फेक्टीव्ह, कार्डियाक आणि अँटीबायोटिक्ससह अत्यावश्यक औषधांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्यात. ज्याला औषधी क्षेत्रात सक्रिय […]

ताज्याघडामोडी

आयकर विभागाची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेच्या 53.72 कोटींच्या व्यवहारांवर बंदी

प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील नागरी पत सहकारी बँकेत जमा केलेल्या 53 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर बंदी घातलीय. आयकर विभागाने नुकत्याच टाकलेल्या छाप्यांमध्ये खाती उघडण्यात “मोठी अनियमितता” समोर आल्यानंतर बँकेवर ही कारवाई केलीय.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) शनिवारी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. कोणत्या संस्थेवर छापा टाकला हे उघड केले नाही सीबीडीटीने सांगितले की, आयकर विभागाने […]

ताज्याघडामोडी

अखेर मान्सूनने देशातून घेतला निरोप, भारतीय हवामान विभागाची घोषणा

मागील काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. आज 25 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतके […]

ताज्याघडामोडी

पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने मिळणार कर्ज; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या ८३ व्या वार्षिक सभेत ही घोषणा केली. शेतकरी सभासदांना शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करणारी ‘केडीसीसी’ही पहिली बँक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. चालू आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि १७५ कोटी रुपयांचा नफा […]

ताज्याघडामोडी

भगीरथ भालकेंचे मौन अन कट्टर समर्थकांची घुसमट

पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात ना कधी पक्ष महत्वाचा ठरला ना कुठल्या पक्षाच्या नेत्याचा आदेश.या तालुक्याच्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकरणात जेव्हा जेव्हा परिचारक गट म्हणजे आताचा पांडुरंग परिवार आणि विठ्ठल कारखान्याशी संबंधित असलेला विठ्ठल परिवार हे आमने सामने आले तेव्हा या दोन्ही गटाच्या कट्टर समर्थकांनी ना आपल्या नेत्याचा पक्ष पाहिला ना राज्यात प्रभावी असलेल्या नेत्याचा पक्ष. या तालुक्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात औषध विक्रेत्याच्या घरासमोरून बुलेट लंपास

पंढरपूर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रकार घडत असून कधी गर्दीच्या वेळी वर्दळीच्या रस्त्यावर लावलेले तर कधी घरासमोरून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे दुचाकी मालकांमध्ये मात्र मोठी अस्वस्थता दिसून येत असून हॅन्डल लॉक केलेल्या दुचाकीही चोरीस जात असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. असाच एक प्रकार पुन्हा उघडकीस आला असून […]

ताज्याघडामोडी

10 मिनिटात दीड लिटर कोल्ड ड्रिंक प्यायला; सहा तासात मृत्यू

कोल्ड ड्रिंक आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेकदा सांगण्यात येते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत अनेकजण कोल्ड ड्रिंक घेतात. मात्र, अतिप्रमाणात कोल्ड ड्रिंक घेणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. वाढत्या उष्णतेने त्रस्त झालेल्या एका 22 वर्षांच्या तरुणाने 10 मिनिटात तब्बल दीड लिटर कोल्ड ड्रिंक घेतले. त्यानंतर सहा तासातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. ‘डेली मेल’ने […]

ताज्याघडामोडी

दोन वर्षीय चिमुकलीसह पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

दोन वर्षीय चिमुकलीसह पत्नीची हत्या करून इसमाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आली आहे. सिरसाळा गावात मोहा रोड परिसरात रात्री साडेनऊ ते 10 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस घटनास्थळी दाखल […]