पंढरपूर शहरातील सांगोला चौक परिसरात सोमवारी रात्री दोन गटात जोरदार धूमचक्री झाली असून या हाणामारीत अनेक जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी एकमेका विरोधात तक्रारी दाखल कारण्यासाठी दोन्ही गटातील लोक पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या हेतूने दाखल झाले होते.यावेळी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाल्याने ती हटविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गाडेकर व सहकारी पोलीस […]
ताज्याघडामोडी
पाणी वापर संस्थामुळे शेतकज्यांना दिलासा.., 25 मार्च पासुन निरा उजवा कालव्याचे आवर्तन सुरु.
पाणी वापर संस्थामुळे शेतकज्यांना दिलासा.., 25 मार्च पासुन निरा उजवा कालव्याचे आवर्तन सुरु. चंद्रभागानगर, (भाळवणी) दि.13 – निरा उजवा कालवा क्षेत्रातील लाभ धारकांनी पाणी वापर संस्था स्थापन केल्याने शेतकज्यांना नियमित पाणी मिळणार असून त्यामुळे दिलासा मिळाला आहे. येत्या 25 मार्च पासून निरा उजवा कालव्याचे पहिले आवर्तन सुरु होणार असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता ठावरे यांनी […]
पंढरपूर येथे जागतिक ग्राहक दिन साजरा
पंढरपूर येथे जागतिक ग्राहक दिन साजरा पंढरपूर, दि. 16:- ग्राहकांना वस्तू निवडण्याचा, त्यांचा दर्जा व प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार असून, 15 मार्च हा दिवस जगभरात जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तहसिल कार्यालय पंढरपूर व आखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यामाने तहसिल कार्यालय पंढरपूर येथे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास तहसिलदार […]
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर
252 पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून केला असून 23 मार्च ते 30 मार्च या कालावधीत या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत तर 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निकालासाठी मात्र जवळपास पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून 2 मे रोजी मतमोजणी नंतर अधिकृत निकाल जाहीर […]
जागेवरच सोक्ष मोक्ष लावताना संघर्ष अटळ
कोरोना महामारीमुळे वर्षभर संपूर्ण जनजीवन विस्कळित आहे. कोरोनामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्वच नागरिक त्रस्त आहेत. कौटुंबिक गरजा भागवताना सर्वांचीच तारेवरची कसरत करत आहेत. आज वीजपुरवठा अत्यावश्यक असून, कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य ऑनलाइन सुरू आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे. अशा स्थितीत वीज जोडणी अत्यावश्यक आहे. पण वीजबिलांच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडण्याची […]
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या पथकाची महिलेविरोधात गंभीर तक्रार
पोलीस तपासात सत्य समोर येणार वीज बिलाची थकीत रक्कम तपासण्यासाठी गोसावी वस्तीत गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरणचे कर्मचारी मनोहर राठोड (वय 35, रा.धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या सहकाऱ्यांसह […]
पुणे येथील प्रसिद्ध मार्केटला मोठी आग; २५ गाळे खाक
पुणे: कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रमुख बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील अंदाजे २५ दुकाने पूर्णपणे जळाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आठ वाहनांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ब्रिटिश […]
कासेगावच्या “आय.सी.एम.एस.” महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी विद्यापीठात सर्वप्रथम
कासेगावच्या “आय.सी.एम.एस.” महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी विद्यापीठात सर्वप्रथम पंढरपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर अंतर्गत असलेल्या श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित महाविद्यालयाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये कासेगाव (ता. पंढरपूर) मधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट स्टडीज’ मधील बी.एससी.(ई.सी.एस) भाग-३ मधील कु. ऋतुजा धनाजी देशमुख या विद्यार्थिनीने ९६.७५ टक्के गुण मिळवून […]
पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी 524 मतदान केंद्रे- उपविभागीय अधिकारी गजानन गुरव
पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी 524 मतदान केंद्रे- उपविभागीय अधिकारी गजानन गुरव पंढरपूर, दि. 15:- 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी 524 मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघात 328 मतदान केंद्रावर मतदान घेतले जात होते. मतदारांची संख्या वाढल्याने तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1000 पेक्षा जास्त मतदान असणाऱ्या मतदान केंद्रासाठी 196 सहायक मतदान केंद्रे […]
पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागात 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
पुणे जिल्हा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 18 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भात प्रादेशिक हवामान केंद्राने (मुंबई) ट्विट करून माहिती दिली आहे. ‘मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वकडील वाऱ्याच्या आंतरक्रिये च्या प्रभावाखाली, 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडामध्ये मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात […]