ताज्याघडामोडी

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर

252 पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून केला असून 23 मार्च ते 30 मार्च या कालावधीत या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत तर 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निकालासाठी मात्र जवळपास पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून 2 मे रोजी मतमोजणी नंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार स्वर्गीय भारत भालके यांच्या नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये झालेल्या दुःखद निधनानंतर या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या ची प्रतीक्षा केली जात होती ही निवडणूक बिनविरोध होणार की 2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रमाणे चुरशीची होणार याची चर्चा राजकीय गोटात रंगत असतानाच राज्यातील कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशीही अटकळ बांधली जात होती.

 राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून देशात सध्या पश्चिम बंगाल आसाम तामिळनाडू आणि पांडेचरी केरळ या राज्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यातील पहिल्या काही टप्प्यात सुरुवातही झाली आहे आज निवडणूक आयोगाने दुपारी जारी केलेल्या प्रेस रिलीज अनुसार विविध राज्यातील पुढील टप्प्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा समावेश केला असून ही पोट निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यामुळे आता खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

स्वर्गीय आमदार भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारीसाठी इच्छुक असून त्याचबरोबर समाधान आवताडे. शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. परिचारक गटाकडून ही निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला जात असला तरी तूर्तास तरी केवळ प्रणव परिचारक यांचे नाव पुढे येताना दिसून येत असले तरी परिचारक आन कडून उमेदवार कोण असणार याबाबत अजूनही अनिश्चितच आहे.

 23 मार्च पासून अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार असून तिथूनच खऱ्या अर्थाने या निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होण्यास सुरवात होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *