ताज्याघडामोडी

पंढरपूर विधानसभा  पोट निवडणूकीसाठी  524 मतदान केंद्रे- उपविभागीय अधिकारी गजानन गुरव

पंढरपूर विधानसभा  पोट निवडणूकीसाठी  524 मतदान केंद्रे- उपविभागीय अधिकारी गजानन गुरव

  पंढरपूर, दि. 15:- 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी 524 मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे.  पंढरपूर विधानसभा  मतदार संघात 328 मतदान केंद्रावर मतदान घेतले जात होते. मतदारांची संख्या वाढल्याने तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1000 पेक्षा जास्त मतदान असणाऱ्या मतदान केंद्रासाठी 196 सहायक मतदान केंद्रे  स्थापन करण्यात आली  असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.  

252 पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी  भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच  निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने, सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, स्वप्निल मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, निवडणुक नायब तहसिलदार सुरेश तिटकारे तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी गुरव म्हणाले, 252-पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोट निवडणूकीसाठी  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यकती काळजी घेतली जाणार आहे.  मतदान केंद्राच्या नावात  बदल, पुर्वीच्या मतदान केंद्राची इमारत मोडकळीस आल्याने मूळ मतदान केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सहाय्यकारी मतदान केंद्राच्या ठिकाणी झालेला बदल, नावात झालेला बदल याबाबतची सर्व माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना देण्यात येणार आहे. यामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर तात्काळ बदल सुचवावेत असेही श्री गुरव यांनी सांगितले.

 252-पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोट निवडणूकीसाठी  एकूण 42 मतदान केंद्राच्या नावांमध्ये बदल झालेला असून, पंढरपूर शहर 22, ग्रामीण 2 तसेच मंगळवेढा येथील 28 केंद्राच्या नावात बदल झाले आहे.  मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो संकलित  करण्याबाबत संबधितांनी बीएलए नेमून  बीएलओनां सहकार्य करावे. तसेच ज्यांचे वय 01.01.2021 रोजी 18 वर्षे पुर्ण झाले आहे त्यांनी मतदार नोंदणी करावी . निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यात कोणालाही मतदार नोंदणी करता येणार नाही. असेही श्री गुरव यांनी सांगितले.

252-पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोट निवडणूक निपक्ष, निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी  पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्यती तयारी केली आहे. या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढल्याने आवश्यक पोलीस बदोबस्त उपलब्ध केला जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *