ताज्याघडामोडी

पंढरपूर येथे जागतिक ग्राहक दिन साजरा

पंढरपूर येथे जागतिक ग्राहक दिन साजरा

 

  पंढरपूर, दि. 16:- ग्राहकांना वस्तू निवडण्याचा, त्यांचा दर्जा व प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार असून, 15 मार्च हा दिवस जगभरात जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तहसिल कार्यालय पंढरपूर व आखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यामाने तहसिल कार्यालय पंढरपूर येथे जागतिक ग्राहक हक्क  दिन साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमास तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, सहायक गट विकास अधिकारी श्री.पिसे,आखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष अण्णा ऐतवाडकर, उपाध्यक्ष पांडूरंग अल्लापूरकर, ग्राहक पंचायतीचे  सुहास निकते, विनय उपाध्ये, महेश भोसले, आझाद अल्लापूरकर, तहसिल कार्यालयाचे श्री. पिरजादे उपस्थित होते.

यावेळी तहसिलदार बेल्हेकर म्हणाले, ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना कुठल्याही अमिषाला बळी न पडता वस्तूची पारख करुन खरेदी करावी. ऑनलाईन वस्तूची खरेदी करताना ग्राहकांनी साधानता बाळगावी. याबाबत फसवणूक झाल्यास ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. तसेच यापुढे येणारा ग्राहक दिन  तहसिल कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येतील असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्राहकांना संरक्षणाचा तसेच वस्तू बाबत माहिती मिळवण्याचा व निवड करण्याचा अधिकार आहे.अनेकदा ग्राहक वस्तूची खरेदी करताना बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतात याचा फायदा विक्रेते घेतात यासाठी ग्राहकांनी जागरुक राहिले पाहिजे असे गटविकास अधिकारी श्री. घोडके यांनी सांगितले. 

ज्या ठिकाणी पैसे देऊन व्यवहार केला जातो त्या सर्व बाबी ग्राहकाच्या न्यायालयीन कक्षेत येतात. याकरता ग्राहकांनी एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूच्या पावतीचा आग्रह केला पाहिजे. पावती घेतल्यानंतर एखादी वस्तू बदलून देण्याचा अधिकार हा दुकानदारास असल्याचे ग्राहक संरक्षण जिल्हा सदस्य नंदकुमार देशपांडे यांनी सांगितले.

         दुकानदार व ग्राहक यांच्यात सलोखा निर्माण करणे व एकमेकाच्या शंकेचे निरसन करणे हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे काम असून, याकरता ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना पावती जवळ घेणे गरजेचे असल्याचे यावेळी  तालुकाध्यक्षआण्णा ऐतवाडकर यांनी सांगितले.

                  प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका सहसचिव धनंजय पंधे यांनी केले. तर तहसिलचे महेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *