ताज्याघडामोडी

कासेगावच्या “आय.सी.एम.एस.” महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी विद्यापीठात सर्वप्रथम

कासेगावच्या “आय.सी.एम.एस.” महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी विद्यापीठात सर्वप्रथम
 
पंढरपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर अंतर्गत असलेल्या श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित महाविद्यालयाच्या  ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये  कासेगाव (ता. पंढरपूर) मधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट स्टडीज’ मधील बी.एससी.(ई.सी.एस) भाग-३ मधील कु. ऋतुजा धनाजी देशमुख या विद्यार्थिनीने ९६.७५ टक्के गुण मिळवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे तर कु. निकिता नेताजी देशमुख या विद्यार्थिनीने ९५.७५ टक्के गुण मिळवून ‘द्वितीय क्रमांक’ मिळवला.
 
           “स्वाईप” संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड  मॅनेजमेंट स्टडीज कासेगाव ,पंढरपूर मधील या शिक्षण संकुलाची स्थापना २००९  साली झाली. तेंव्हापासून आय.सी.एम.एस.महाविद्यालयाने उत्कृष्ट  निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून नेहमी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत वाढता ठेवणारे ग्रामीण भागातील एक उत्कृष्ट कॉलेज म्हणून आय.सी.एम.एस कॉलेज कासेगावचे नाव घेतले जाते. या विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ. ए.एस.भोईटे, विभागप्रमुख प्रा.जे. एन. अर्जून, वर्गशिक्षिका सौ.एस.व्ही.भोसले यांच्या सह इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष एच.एम. बागल, उपाध्यक्ष बी.डी रोंगे, सचिव डॉ.बी.पी रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे, कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री भोसले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *