ताज्याघडामोडी

पाणी वापर संस्थामुळे शेतकज्यांना दिलासा.., 25 मार्च पासुन निरा उजवा कालव्याचे आवर्तन सुरु. 

पाणी वापर संस्थामुळे शेतकज्यांना दिलासा..,
25 मार्च पासुन निरा उजवा कालव्याचे आवर्तन सुरु. 
चंद्रभागानगर, (भाळवणी) दि.13 – निरा उजवा कालवा क्षेत्रातील लाभ धारकांनी पाणी वापर संस्था स्थापन केल्याने शेतकज्यांना नियमित पाणी मिळणार असून त्यामुळे दिलासा मिळाला आहे. येत्या 25 मार्च पासून निरा उजवा कालव्याचे पहिले आवर्तन सुरु होणार असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता ठावरे यांनी दिली. 
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर चेअरमन कल्याणराव काळे व निरा उजवा कालवा विभागाचे उप कार्यकारी अभियंता ठावरे यांचे समवेत सर्व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष यांचे उपस्थितीत 13 मार्च 2021 रोजी उन्हाळी हंगामातील प्रथम पाण्याचे नियोजनबाबत बौठक घेण्यात आली. 
कल्याणराव काळे यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने पाणी वापर संस्था निर्माण करण्याकरीता गेली नऊ ते दहा वर्षे सातत्याने पाठपुरावा केला.प्रसंगी आंदोलने उभा करुन सदरच्या संस्थेस मंजुरी मिळविली. संस्थेच्या चेअरमन यांनी आधिकारी यांचेशी समन्वय साधून शेवटच्या  शेतकर्या  पर्यंत कसे पाणी पोहोचेल याची दक्षता घ्यावी. कॅनॉल मधील   झाडे-झुडपामुळे पाण्याच्या गतीस होणारा अडथळा कसा दुर करता येईल याचेही नियोजन संस्था चालकांनी केल्यास बज्यापौकी कमी वेळेत शेतकज्यांचे आवर्तन पुर्ण होईल. शेतीसाठी चालु हंगामातील उन्हाळी प्रथम पाण्याची पाळी दि.25 मार्च रोजी देण्यात येणार असून, दुसज्याही पाण्याच्या पाळीचे नियोजन लवकरच करण्यात येईल असे ठावरे यांनी सांगीतले. तर सर्व पाणी वापर संस्थांनी प्रथम आवर्तन सोडण्यापुर्वी थकबाकी आणि चालु बाकी भरुन प्रशासनास सहकार्य करावे शेतकऱ्यांनी  भविष्यात काटकसरीने पाण्याचा वापर केल्यास भविष्यात पाण्याची अडचण भासणार नाही असे पाणी वापर संस्थेचे मार्गदर्शक, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगीतले. उपकार्यकारी अभियंता ठावरे यांनी लवकरच ज्वॉर्इंट इन्सपेक्शन करुन पाणी वापर संस्थांचे अनुदानाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगीतले. 
सदर सभेस सहकार शिरोमणीचे माजी संचालक दिपक गवळी, विठठलचे संचालक विलास देठे,धनंजय कवडे, हरीभाऊ लिंगे, पांडूरंग काळे,कौलगे, महादेव नागणे, हणमंत लोखंडे,माजी सरपंच प्रकाश देठे, जयंत शिंदे, भोजलिंग बाबर तसेच निरा उजवा कालवा विभागाचे शाखाधिकारी दिनेश राऊत, सुजित काळे, डेप्यु इंजिनिअर बेंदगुडे तसेच सहाय्यक कार्यकारी अभियंता हर्षवर्धन भोसले, पाणी वापर संस्थांचे चेअरमन,सचिव उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्रीगणेश पाणी वापर संस्थेचे चेअरमन श्री.महादेव लिंगडे यांनी मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *