ताज्याघडामोडी

वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या पथकाची महिलेविरोधात गंभीर तक्रार 

पोलीस तपासात सत्य समोर येणार 

वीज बिलाची थकीत रक्कम तपासण्यासाठी गोसावी वस्तीत गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महावितरणचे कर्मचारी मनोहर राठोड (वय 35, रा.धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या सहकाऱ्यांसह थकील बिलाची रक्कम तपासत असताना एक महिला हातात कोयता घेऊन तेथे आली. तिने आरडाओरडा करत माझ्या घरी कसे आलात असे म्हणत तुम्हाला रेप करण्याचा आरोपी करेल अशी धमकी दिली.

तर तिच्या एका साथीदाराने पथकाच्या हातातून शासकीय कागदपत्रे हिसकावून घेतली. तसेच इतरांनी कॉलर पकडून व लोखंडी रॉड उगारुन मारहाणीचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक साखरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *