पंढरपूर पोटनिवडणूकीसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल 22 इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज पंढरपूर. 23:- पंढरपूर विधानसभा पोटनिवडूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी संतोष महादेव माने (अपक्ष) यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 23 मार्च 2021 रोजी 22 इच्छुक उमेदवारांनी 24 […]
ताज्याघडामोडी
स्वेरी नेहमीच विद्यार्थी हिताला प्राधान्य देते – प्रा. उज्वला पाटील स्वेरीत ‘सायन्स ओरिएन्टेशन प्रोग्राम-२०२१’ संपन्न
स्वेरी नेहमीच विद्यार्थी हिताला प्राधान्य देते – प्रा. उज्वला पाटील स्वेरीत ‘सायन्स ओरिएन्टेशन प्रोग्राम-२०२१’ संपन्न पंढरपूर– ‘सध्याची बदलत जाणारी शिक्षण पद्धत पाहता भविष्यात आम्हा शिक्षकांना राष्ट्र निर्मिती करत असताना काळाची गरज ओळखणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यंत जलद गतीने पुढे जाणारे शैक्षणिक धोरण आणि त्यातील आधुनिकीकरण यातील बदलाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीबद्दल फारसे सखोल ज्ञान नसते. […]
शैला गोडसेंचा आक्रमक संघर्ष विचारात घेत राजकीय पुनर्वसन केले जाणार ?
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जनतेच्या विविध प्रशांसाठी गेल्या काही वर्षांपासून पायाला भिंगरी बांधून ग्रामपंचायत पातळीपासून ते थेट मंत्रालया पर्यंत पाठपुरावा करून विविध प्रश्नांना वाचा फोडणार्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलाताई गोडसे यांना शिवसेनेच्या हक्काच्या पंढरपूर विधासभा मतदार संघातून उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते. स्वतः शैला गोडसे यांनीही २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवायच्या दृष्टीकोनातुन […]
रेशन दुकानदारांना विमा संरक्षण न दिल्यास धान्य वितरण बंद करणार
शनिंग दुकानदारांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे. विमा संरक्षण न दिल्यास रास्त भाव रेशनिंग दुकानदार धान्य वितरण करणे बंद करतील, असा इशारा ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशनच्या वतीने देण्यात आला आहे. फेडरेशनतर्फे अध्यक्ष तथा माजी खासदार गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ, अर्थ […]
लग्नाला तयार नसल्याने बापानेच केला मुलीचा खून
लग्नाला तयार नसल्याने मुलीच्या डोक्यात खोरे घालून पित्यानेच तिचा खून केल्याची घटना आटपाडी तालुक्यातील बनपूरी येथे घडली आहे. खुनानंतर चौघांच्या मदतीने पित्याने मुलीचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र, मृतदेह अर्धवट जळल्याने तो मध्यरात्रीच दफन करण्यात आला. दरम्यान, आठ दिवसांनंतर हा प्रकार उघडकीला आला असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ताई उत्तम चौगुले (वय 18) असे […]
नामनिर्देशन पत्र दाखल करताना दोनच व्यक्तींना प्रवेश
पंढरपूर, दि. 21:- पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 मार्च ते 30 मार्च दरम्यान सार्वजनिक सुट्टी वगळता सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दोनच व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. पंढरपूर […]
स्वेरी फार्मसी महाविद्यालयाच्या तेरा विद्यार्थ्यांचे जी-पॅट परिक्षेत यश
स्वेरी फार्मसी महाविद्यालयाच्या तेरा विद्यार्थ्यांचे जी-पॅट परिक्षेत यश पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित औषधनिर्माण शास्त्र (बी. फार्मसी) महाविद्यालयातील तब्बल १३ विद्यार्थ्यांना जीपॅट (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीटयूड टेस्ट) २०२१ या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत उज्ज्वल यश मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वेरी संचलित औषधनिर्माणशास्त्र तथा बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे […]
सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री
देशात खाद्य तेल, पेट्रोल-डिझेल आणि LPG गॅस सिलेंडर यांच्या वाढत्या किमतीनं आधीच हैराण असलेल्या नागरिकांसाठी आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. महागाईच्या या काळात नागरिकांना आता औषधांसाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे. नॅशनल फार्मस्यूटीकल प्राइसिंग ऑथिरीटीनं शुक्रवारी याबाबत माहिती देताना म्हटलं, की सरकरानं औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्समध्ये […]
व्हॉट््सअॅपला रोखण्याची केंद्राची न्यायालयात मागणी
व्हॉट््सअॅपचे नवे व्यक्तिगतता धोरण आणि सेवाशर्तींच्या अंमलबजावणीवर प्रतिबंध घालण्याची विनंती केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयास केली. नव्या धोरणाची अंमलबजावणी १५ मेपासून केली जाणार आहे. व्हॉट््सअॅप या समाज माध्यम व्यासपीठाच्या व्यक्तिगतता धोरणाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती त्याबाबत माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही विनंती करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व खासगी कार्यालयं, आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती;शासनाचे आदेश
मुंबई : कोविड रुग्णांचा महाराष्ट्रात पुन्हा झपाट्याने वाढणारा आकडा पाहता काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ लागले आहेत. याच धर्तीवर नुकतेच राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ( आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) इतर ठिकाणी 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.सर्व […]