ताज्याघडामोडी

स्वेरी फार्मसी महाविद्यालयाच्या तेरा विद्यार्थ्यांचे जी-पॅट परिक्षेत यश

स्वेरी फार्मसी महाविद्यालयाच्या तेरा विद्यार्थ्यांचे जी-पॅट परिक्षेत यश

पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटपंढरपूर संचलित औषधनिर्माण शास्त्र (बी. फार्मसी) महाविद्यालयातील तब्बल १३ विद्यार्थ्यांना जीपॅट (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीटयूड टेस्ट) २०२१ या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत उज्ज्वल यश मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       स्वेरी संचलित औषधनिर्माणशास्त्र तथा बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे कांचन धानप्पा नागराळेगीतांजली लक्ष्मण कदमऋतुजा राजाराम भिसेऋतुजा सतीश जाधवकिशोरी कैलास सुरवसे  शिवानी श्रीकांत सरवदेप्रतीक्षा रामचंद्र भोसलेहर्षदा गोरख जानकरवर्षा अर्जुन लवटेसुशांत रोहिदास आठवलेरोहन नेमीनाथ क्षीरसागरयोगेश पंडित पवार आणि योगेश आण्णा हडल अशा एकूण १३ विद्यार्थ्यांनी  एम. फार्मसी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी एन. टी. ए.अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील अतिशय अवघड परंतु आवश्यक असणाऱ्या जी-पॅट परिक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखालीबी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली तसेच उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या जी-पॅट परीक्षेत उत्तुंग यश मिळविले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे पंढरपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे. २००६ साली स्थापन झालेल्या बी. फार्मसी महाविद्यालयाने प्रत्येक वर्षीची उज्वल यशाची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे. सन २०१० साली संतोष गेजगे या विद्यार्थ्याने याच परीक्षेत भारतात ११७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यशाचा पाया रचला होता. तेथून पुढे प्रत्येक वर्षी स्वेरीच्या बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना जी-पॅटमध्ये भरघोस यश मिळत आहे आणि हीच परंपरा यंदा देखील कायम राखली असल्याचे दिसून येते. यंदाच्या वर्षी कोरोना  महामारीमुळे सर्व क्लासेस ऑनलाईन पद्धतीने झाले. अशा कठीण काळात देखील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यार्थी या यशाचे श्रेय शिक्षकांबरोबरच पंढरपूर पॅटर्नला देतात. मिळालेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे हे मात्र निश्चित. यशस्वी विद्यार्थ्यांना जी-पॅटचे समन्वयक प्रा. विजय चाकोतेवर्गशिक्षक प्रा. रामदास नाईकनवरे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसलेसंस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तकॅम्पस इन्चार्जबी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियारसर्व प्राध्यापकशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *