ताज्याघडामोडी

स्वेरी नेहमीच विद्यार्थी हिताला प्राधान्य देते – प्रा. उज्वला पाटील स्वेरीत ‘सायन्स ओरिएन्टेशन प्रोग्राम-२०२१’ संपन्न

स्वेरी नेहमीच विद्यार्थी हिताला प्राधान्य देतेप्रा. उज्वला पाटील

स्वेरीत सायन्स ओरिएन्टेशन प्रोग्राम-२०२१’ संपन्न

पंढरपूर सध्याची बदलत जाणारी शिक्षण पद्धत पाहता भविष्यात आम्हा शिक्षकांना राष्ट्र निर्मिती करत असताना काळाची गरज ओळखणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यंत जलद गतीने पुढे जाणारे शैक्षणिक धोरण आणि त्यातील आधुनिकीकरण यातील बदलाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीबद्दल फारसे सखोल ज्ञान नसते. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना उच्च तंत्रशिक्षण घ्यायची इच्छा असतानाही केवळ अपुऱ्या ज्ञानामुळे अभियांत्रिकी सारख्या बहुमोल शिक्षणापासून वंचित राहावे लागते आणि हाच धागा स्वेरीने पकडून सायन्स ओरिएन्टेशन प्रोग्रामच्या माध्यमातून भविष्यातील शिक्षणाच्या बदलत्या स्वरुपाची बहुमोल माहिती दिली. त्यामुळे तंत्रज्ञानातील महत्वाच्या बाबीशैक्षणिक धोरण व भविष्यातील विश्व याची माहिती झाली. यावरून स्वेरी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताकडे अधिक लक्ष देते असे दिसून येते.’ असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूलमंगळवेढाच्या प्रा. उज्वला पाटील यांनी केले.

        गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटपंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये सायन्स ओरिएन्टेशन प्रोग्राममध्ये प्रा. उज्वला पाटील उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वासुदच्या एस.एस. लिगाडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.के.पाटील होते. या चर्चासत्रात विज्ञान-तंत्रज्ञानातील आधुनिक प्रवाहऑनलाईन शिक्षण पद्धती: साधने व पद्धती या विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. प्रारंभी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते यांनी समृद्धीकडे वाटचाल करताना विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानकडे जाणारा प्रवास कसा असावायाची माहिती देताना इंडस्ट्री ४.० आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीज याविषयी महत्वाची माहिती दिली. शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांनी बदलत्या शिक्षण पद्धतीची माहिती देताना शिक्षणाला तंत्रज्ञानाचा आधार देवून उच्च तंत्रशिक्षण कसे असावे तसेच या शिक्षणाची स्वेरीत रुजवलेली संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. पाटील यांनी ‘विद्यार्थी घडविताना भविष्यातील शैक्षणिक धोरण आणि शिक्षण पद्धतीत होणारे बदल काय असतील यामुळे शिक्षकांसमोर कोणती आव्हाने असतील याची स्वेरीने उत्तम पद्धतीने माहिती दिल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘शाळा,महाविद्यालयात विद्यार्थी घडविताना शिक्षकगुरुजींना अत्यंत परिश्रम करावे लागतात. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी केलेला अभ्यास महत्वाचा असतो. सध्याच्या स्पर्धेच्या युगात वावरताना विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यार्थ्यांना अचूक माहिती देताना गाफील राहू नये. यासाठी सखोल ज्ञान आवश्यक असते. स्वेरीची संस्कृती आणि पंढरपूर पॅटर्न’ यावर पालकांचा विश्वास आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात बदलत्या शिक्षण पद्धतीला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी आत्ताच बदलांना सामोरे जा.’ असे सांगून स्वेरीची वाटचाल सांगितली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉलेज प्रशासनाने मास्कसेनिटायझरचा वापर करून दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील याची काळजी घेतली. हे चर्चासत्र स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखालीस्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवारप्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरीएमबीएचे विभागप्रमुख प्रा.करण पाटील यांच्या समन्वयातून मोजक्या स्टाफसह पार पडला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे डॉ. एस.डी. राऊत आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते. चर्चासत्रात उपस्थित शिक्षकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर प्रा. करण पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *