देशात खाद्य तेल, पेट्रोल-डिझेल आणि LPG गॅस सिलेंडर यांच्या वाढत्या किमतीनं आधीच हैराण असलेल्या नागरिकांसाठी आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. महागाईच्या या काळात नागरिकांना आता औषधांसाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे. नॅशनल फार्मस्यूटीकल प्राइसिंग ऑथिरीटीनं शुक्रवारी याबाबत माहिती देताना म्हटलं, की सरकरानं औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ करण्याची मान्यता दिली आहे. पेनकिलर म्हणजेच वेदना कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या, अँटीइन्फ्लाटीव, कार्डियक आणि अँटीबायोटीक्ससह इतर आवश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून वाढण्याची शक्यता आहे.
