ताज्याघडामोडी

देशभरातले टोलनाके हटवणार

येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद करण्यात येतील आणि टोलची रक्कम जीपीएस इमेजिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली.गडकरी यांनी टोल नाके बंद करण्याचा आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना सांगितले की, गेल्या सरकारनी शहरांमध्ये अनेक ठिकाणी टोल नाके उभे करून पैसे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

25 लाखाच्या बदल्यात 50 लाख देण्याच्या बहाण्याने हॉटेल व्यवसायिकाची फसवणूक

 25 लाखाच्या बदल्यात 50 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत 23 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. आरोपींनी 25 लाख घेऊन हातात कागदात गुंडाळून डुप्लिकेट बंडल देऊन फसवणूक केली आहे. प्रवीण प्रकाश (वय 30, काळेवाडी), मालेश सुरेश गावडे (वय 42) व व्यंकटरमण वसंतराव बाहेकर (वय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आईला मारहाण करणाऱ्या मुलाचा खून

भंडारा .भाजी चांगली बनविली नाही’, असे म्हणून आईला शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या मुलाचा वडिलांसह दोन भावंडांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर भीतीपोटी त्याचा मृतदेह जंगलात पुरला. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेचे बिंग १५ मार्च रोजी उघडकीस आले. याप्रकरणी वडील आणि दोन भावंडांविरुद्ध साकोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी साकोली तालुक्यातील तुडमापुरी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दगडूशेठ’ गणपतीला मोतेवारने दान केलेले दीड किलो सोने जप्त

पुणे समृद्ध जीवन फाउंडेशनचे संचालक महेश मोतेवार याने दगडूशेठ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ताब्यात घेतले. ठेवीदारांच्या पैशातूनच दागिने अर्पण केल्याचे तपासात समोर आल्यानंतर ‘सीआयडी’ने ही कारवाई केली.

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

साताऱ्यात पेट्रोलने भरलेल्या दोन विहिरी

सातारा, 03 मार्च : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागली आहे. चोरांनीही आता पेट्रोलकडे मोर्चा वळवला असून साताऱ्यात पेट्रोल चोरीसाठी चक्क पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडली आहे. धक्कादायक म्हणजे, पेट्रोल पाईपलाईन तशीच सोडून दिल्यामुळे परिसरातील विहिरीत पेट्रोलच पेट्रोल झाले आहे. पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी पेट्रोल वाहून नेहणारी पाईपलाईन फोडल्याची घटना उजेडात आली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर […]

ताज्याघडामोडी

पाटस येतील तीन सख्या भावांचा आठ दिवसात कोरोनामुळे मृत्यू 

पाटस तालुका दौंड येथील तीन सख्या भावांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. केवळ अवघ्या आठ दिवसांत या तिन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. घटनेबद्दल नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.ग्रामीण भागातही करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  आहे  एका कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा (दि.19) मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याच कुटुंबातील आणखी चौघांवर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भूमिअभिलेखच्या लाचखोर लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरी

तक्रारदार यांना फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच मागून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी भूमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक कृष्णात यशवंत मुळीक (वय 47, रा. प्लॉट नं. 16, जेजुरीकर कॉलनी, सिद्धनाथवाडी, वाई) यास येथील विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी 4 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड व तो न दिल्यास 2 महिने […]

ताज्याघडामोडी

भाजपातून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका

भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावीच लागेल. पक्ष वाढीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजली पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड केलं आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी कार्यकर्ता आढावा बैठक झाली. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांवर विश्वास […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

2 कोटी 69 लाख गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अध्यक्षाला अटक

पुणे – पिंपळे निलख येथील श्री छत्रपती अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेमध्ये कर्ज आणि ठेवीत 2 कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणात सांगवी पोलिसांनी अध्यक्षाला अटक केली. त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालायने दिला आहे. विलास एकनाथ नांदगुडे (वय 61, रा. पिंपळे निलख) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मिरचीपूड डोळ्यांत फेकून लुटायचे, दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात

सांगली: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. मिरज-म्हैसाळ मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत चार दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर एक दरोडेखोर पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दरोडेखोरांकडून मिरचीपूड, कोयते, लोखंडी रॉड, हातोडी, मोबाइल जप्त केले आहेत. निमजी इगलिस काळे (वय ६२), परारी उर्फ […]