भंडारा .भाजी चांगली बनविली नाही’, असे म्हणून आईला शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या मुलाचा वडिलांसह दोन भावंडांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर भीतीपोटी त्याचा मृतदेह जंगलात पुरला. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेचे बिंग १५ मार्च रोजी उघडकीस आले. याप्रकरणी वडील आणि दोन भावंडांविरुद्ध साकोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी साकोली तालुक्यातील तुडमापुरी येथे घडली.
