गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

2 कोटी 69 लाख गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अध्यक्षाला अटक

पुणे – पिंपळे निलख येथील श्री छत्रपती अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेमध्ये कर्ज आणि ठेवीत 2 कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणात सांगवी पोलिसांनी अध्यक्षाला अटक केली. त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालायने दिला आहे.

विलास एकनाथ नांदगुडे (वय 61, रा. पिंपळे निलख) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायदा, फसवणूक आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भगवान बोत्रे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2014 या कालावधीत घडली. या प्रकरणात आणखी नऊ जणांवर गुन्हा दाखल आहे.

त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी केली.

गुन्ह घडलेल्या कालावधीत तो अध्यक्ष होता. गुन्ह्यातील रक्कमेबाबत तपासणे करणे, बनावट कागदपत्रे कोठे बनवली, इतर गुन्हा दाखल असलेल्यांच्या शोधासाठी, तसेच, गुन्ह्याची व्यापी मोठी असून, त्याच्याकडे सखोल तपास करणे आवश्‍यक आहे. यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍड. राजेश कावेडीया यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *