पुणे समृद्ध जीवन फाउंडेशनचे संचालक महेश मोतेवार याने दगडूशेठ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ताब्यात घेतले. ठेवीदारांच्या पैशातूनच दागिने अर्पण केल्याचे तपासात समोर आल्यानंतर ‘सीआयडी’ने ही कारवाई केली.
