येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद करण्यात येतील आणि टोलची रक्कम जीपीएस इमेजिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली.गडकरी यांनी टोल नाके बंद करण्याचा आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना सांगितले की, गेल्या सरकारनी शहरांमध्ये अनेक ठिकाणी टोल नाके उभे करून पैसे वसूल करण्याची यंत्रणा उभी केली होती. ही यंत्रणा अत्यंत चुकीची व अन्यायपूर्ण होती. यातून टोल चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे हे सर्व टोल नाकेच हटवण्याचे काम वर्षभरात केले जाणार आहे. हे टोल नाके बंद केल्यानंतर टोल वसुलीसाठी जीपीएस इमेंजिक तंत्रज्ञान वापरले जाईल. त्यामुळे शहरांच्या आत टोल नाके राहणार नाही. टोल नाके नसल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा दिसणार नाही आणि इंधनाची बचत त्यामुळे होईल, असे गडकरी म्हणाले.
