Uncategorized

६ लाख ६६ हजारांच्या फसवणूक प्रकरणी राज पाटील यांच्यासह तिघांविरोधात फिर्याद दाखल 

विवाह संस्थेमध्ये काम करून महिना १५ हजार रुपये मिळतील असे सांगत तसेच आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून ८० हजार रुपये मिळवून देतो,विजातीय विवाहासाठी ५० हजार मिळवून देतो आमची  महाराष्र्ट् शासन संचलित नवरी मिळे नव-याला या नावाने सदरची संस्था असून सदर संस्था मार्फत आंतरजातिय विवाह झालेल्ा नवरी व नव-याला शासन अनुदान देते व त्याकरिता तुम्ही काही सदस्यांना आपल्या […]

Uncategorized

टाकळी रोड जगदंबा नगर येथे घरफोडी 

        पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी हद्दीतील जगदंबा नगर येथे घरमालक कुटूंबासह परगावी गेल्याची संधी साधत चोरटयांनी दरवाजाचे कडीकोयंडा कुलूप उचकटून सोन्याचांदीचे दागिने,चांदीच्या मूर्ती तसेच रोख रक्कम ५० हजार लंपास केली असून या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.या बाबत सोमनाथ देठे रा.लक्ष्मी टाकळी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली […]

ताज्याघडामोडी

”त्या”ऍक्टिव्हा चालकाच्या शोधात पंढरपूर शहर पोलीस 

पंढरपूर शहरातील अतिशय वर्दळीचा व सातत्याने अपघात प्रवण म्हणून ओळखला जाणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज रोडवर अहिल्या धाब्यानजीक शिरढोण तालुका पंढरपूर येथील ग्रामस्थ महादेव शिवाजी भुसनर यांच्या दुचाकीस एका पांढऱ्या रंगाच्या अँक्टिव्हा मोटारसायकल स्वाराने राँग साईडने भरधाव वेगात येऊन धडक दिल्याने या अपघातात सदर महादेव शिवाजी भुसनर  हे गंभीर जखमी झाले होते.या अपघातानंतर सदर ऍक्टिव्हा […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढ्यात 4 हजार 600 ब्रास जप्त वाळू साठ्याचा लिलाव

पंढरपूर, दि. 12:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.      मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सन 2018-19 मध्ये संयुक्त वाळू ठेक्याच्या  लिलावामधील शिल्लक असलेल्या  […]

Uncategorized

शिरढोण येथील अवैध वाळू उपशावर पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई 

          पंढरपूर उपविभागीय कार्यालयाच्या अधिनस्त विशेष पथकाने शिरढोण तालुका पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर बुधवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचे दोन पिकअप वाळूसह ताब्यात घेतले असून या प्रकरणी ६ जणांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           […]

Uncategorized

देवाचा नवस फेडण्यासाठीचे बोकड चोरटयांनी पळवले

बोकड आणले परत,गुन्हा दाखल              पंढरपूर तालुक्यातील करोळे येथील शेतकरी बाजीराव मधुकर पाटील हे शेतीबरोबरच शेळीपालनाचा जोडव्यवसाय करतात.२८ डिसेंबरच्या मध्यरात्री बाजीराव पाटील हे झोपले असता त्यांना रात्री १ वाजनेच्या सुमारास चुलत भावाने गावात शेळीचोर आले आहेत असा फोन करून बाजीराव पाटील याना सावध केले असता बाजीराव पाटील यांनी शेळ्या बांधलेल्या […]

Uncategorized

आत्याच्या मुलानेच केली घरातून दुचाकीसह लाख रुपयाची रक्कम लंपास

          पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील शेतकरी कल्याण तुकाराम सुतार यांच्या घरी त्यांच्या आत्याचा मुलगा सतिश सुभाष कऴसकर रा. विट खेडा औरंगाबाद, हा कामासाठी एक महिण्यापासुन राहण्यास आला होता.व चुलत भाऊ उमेश निवृत्ती सुतार यांचे श्री विठ्ठल फँब्रीकेशन दुकानात काम करत होता.फिर्यादी कल्याण सुतार यांच्याकडे त्यांचा मावस भाउ लखन चंद्रकांत मोरे रा. […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू उपसा विरोधात मोठया कारवाया तीन महिन्यात 21केसेस,86हजार पेक्षा जास्त किमतीची वाळूसह,87लाखापर्यंत किंमतीची वाहने जप्त

            तीन महिन्यात 21केसेस,86हजार पेक्षा जास्त किमतीची वाळूसह,87लाखापर्यंत किंमतीची वाहने जप्त.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सर्वच जिल्ह्यातील वाळू उपसा आणि इतर अवैध धंदे बंद करण्याबाबत सूचना देताच पंढरपूर तालुका पोलिसांनी याची तात्काळ अमलबजावणी करीत मागील तीन महिन्यापासून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अवैध धंद्यावर […]

गुन्हे विश्व निविदा सूचना

बाभुळगावच्या शेतकऱ्याच्या गोठयातून म्हशी लंपास

            थंडीचा कडाका वाढत चालला कि चोरीच्या घटना वाढतात हे जणू समीकरणच आहे.रात्री लवकरच शुकशुकाट होत असल्याचा फायदा चोरटे उचलत असून गेल्या काही दिवसात पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत व यात चोरटयांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे दिसून आले.दिनांक १९ डिसेंबरच्या मध्यरात्री पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

गोपाळपूर नजीक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची कारवाई 

           पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या परिसरातुन होणाऱ्या अवैध वाळू उपशावर गेल्या काही दिवसात सातत्यपूर्ण कारवाई होताना दिसून येत असून रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत गोपाळपूर नजीक केलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे एक पिकअप वाहन १ ब्रास वाळूसह ताब्यात घेतले असून […]