ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू उपसा विरोधात मोठया कारवाया तीन महिन्यात 21केसेस,86हजार पेक्षा जास्त किमतीची वाळूसह,87लाखापर्यंत किंमतीची वाहने जप्त

 

          तीन महिन्यात 21केसेस,86हजार पेक्षा जास्त किमतीची वाळूसह,87लाखापर्यंत किंमतीची वाहने जप्त.सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सर्वच जिल्ह्यातील वाळू उपसा आणि इतर अवैध धंदे बंद करण्याबाबत सूचना देताच पंढरपूर तालुका पोलिसांनी याची तात्काळ अमलबजावणी करीत मागील तीन महिन्यापासून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अवैध धंद्यावर धाडी टाकून कारवाई केली आहे. तसेच वाळू उपसा करणारविरुद्ध तर कठोर पावले उचलून, तीन महिन्यात 21 केसेस दाखल केल्या आहेत. यामध्ये एकूण86हजार500 रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे. यामध्ये एकूण86लाख 96हजार रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
मागील ऑक्टोबर महिन्यात एकूण4केसेस, त्यामध्ये7आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबरमध्ये 6केसेस, त्यामध्ये4 आरोपी तर डिसेंम्बर मध्ये 11केसेस करून 11आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

         अशाप्रकारे मागील तीन महिन्यात केवळ वाळू विरोधात कारवाई केली असून यापुढेही कोण वाळू उपसा करीत असल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *