Uncategorized

देवाचा नवस फेडण्यासाठीचे बोकड चोरटयांनी पळवले

बोकड आणले परत,गुन्हा दाखल

             पंढरपूर तालुक्यातील करोळे येथील शेतकरी बाजीराव मधुकर पाटील हे शेतीबरोबरच शेळीपालनाचा जोडव्यवसाय करतात.२८ डिसेंबरच्या मध्यरात्री बाजीराव पाटील हे झोपले असता त्यांना रात्री १ वाजनेच्या सुमारास चुलत भावाने गावात शेळीचोर आले आहेत असा फोन करून बाजीराव पाटील याना सावध केले असता बाजीराव पाटील यांनी शेळ्या बांधलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता देवाच्या नवसासाठीचे बोकड गायब झाल्याचे दिसून आले.
             बोकड चोरीस गेल्याचे दिसताच सदर शेतकरी बाजीराव पाटील यांनी बाळासाहेब ,मधुकर बाबा सदगर याना सोबत घेत मोटारसायकलवरून बोकडचोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या बाबत त्यांनी जागोजागी चौकशी केली असता तीन अनोळखी लोक मोटार सायकलवर काळ्या रंगाचे बोकड घेवुन गेले आहेत ते लोक अकलुजच्या दिशेने निघुन गेले आहेत असे सांगण्यात आले.म्हाळुंग ता माळशिरस गावचे हद्दीत व्हरगर वस्तीजवळ आमचे बोकड मोटार सायकल वरुन घेवुन चाललेले लोक दिसले.यावेळी झालेल्या झटापटीत चोरटे बोकड व त्यांची मोटारसायकल जागीच टाकून पळून गेले.या प्रकरणी तीन अज्ञात चोराविरोधात करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *