Uncategorized

शिरढोण येथील अवैध वाळू उपशावर पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई 

          पंढरपूर उपविभागीय कार्यालयाच्या अधिनस्त विशेष पथकाने शिरढोण तालुका पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर बुधवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचे दोन पिकअप वाळूसह ताब्यात घेतले असून या प्रकरणी ६ जणांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          या बाबत मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना शिरढोण येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याची खबर मिळाली.त्यांनी तात्काळ कारवाईच्या सूचना देताच पो.काँ.पंजाब सुर्वे ,पो.काँ. हुलजंती,पो.ना. सोनवले,चा. पो. क. मुजावर हे तात्काळ खाजगी दुचाकीवरून रात्री १ वाजता या ठिकाणी गेले असता.अशोक लेलन्डं कंपनिचे पांढरे रंगाचे दोन पिकअप वाळु भरुन वाहतुक करीत असताना आढळून आले. सदर वाहनांना हाताने थांबण्याचा इशारा केला असता सदर दोन्ही पिकअप वाहनाचे चालक व त्यांचे इतर साथीदार हे पोलीसांची चाहुल लागल्याने वरील वर्णनाची गाडी जागीच सोडुन अंधाराचा फायदा घेवुन पऴुन गेले.सदर अशोक लेलन्डं कंपनिचे पांढरे रंगाचे दोन्ही पिकअप वाहनाचे चालका बाबत व इतर पळुन गेलेल्या इसमा बाबत आजुबाजुला चौकशी केली असता त्यांची नावे 1) आण्णा घन्टें 2) लखन घन्टें 3) महेश शिंदे 4) गोट्या अधटराव व इतर दोन आनोळखी इसम असे असल्याचे समजले. सदर दोन्ही पिकअप वाहने तपासुन पाहिले असता त्यात अंदाजे प्रत्येकी अर्धा -आर्धा ब्रास वाळू मिळून आल्याने सदरची दोन्ही अशोक लेलन्डं कंपनीचे पिकअप वाहने वाळूसह ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणून लावलेले आहेत. सदर पळुन गेले चालक व इसमा विरूध्द पो.काँ. पंजाब इद्रंजीत सुर्वे सरकार तर्फे भा.दं.वि.कलम 379,34 सह गौण खनिज कायदा 1978 कलम 4(1), 4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *