गुन्हे विश्व ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

गोपाळपूर नजीक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची कारवाई 

           पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या परिसरातुन होणाऱ्या अवैध वाळू उपशावर गेल्या काही दिवसात सातत्यपूर्ण कारवाई होताना दिसून येत असून रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत गोपाळपूर नजीक केलेल्या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे एक पिकअप वाहन १ ब्रास वाळूसह ताब्यात घेतले असून या कारवाईत वाहनासह ३ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. 
           या बाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार  जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पोलीस पथकाचे पोलीस निरीक्षक विनय बहिर विशेष पोलीस पथकाचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांना बातमीदारामार्फत बातमी मिऴाली की मौजे गोपाळपूर ता.पंढरपूर गावचे शिवारात भिमानदीपात्रातून एक वाहण वाळू भरून वाहतूक करत आहे.या बाबत त्यांनी कारवाईचे आदेश दिले असता पोकाँ/580 राठोड, पोकाँ/532 मदने, पोकाँ/ 2165 झिरपे, व या प्रकरणातील फिर्यादी पोकाँ/ 366 कल्याण विठ्ठल भोईटे हे खाजगी वाहणाने गोपाळपूर गावाचे शिवारात आले व तिथे खाजगी वाहण लावून पायी नदीकडे चालत जात असताना भीमा नदी पात्रातून एक पिकअप वाहण समोर येत असताना दिसले. त्यास हाताने थांबवण्याचा ईशारा केला असता सदर वाहण चालक त्याचे ताब्यातील वाहन जागीच थांबवून पळून जात असताना त्यास या पथकातील कर्मचाऱ्यांनी जागीच पकडले. सदर चालकास त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव विनायक नाना देवमारे वय. 23 रा. गोपाळपूर ता. पंढरपूर असे असल्याचे सांगितले. व मालकाबाबत विचारणा केली असता त्याने मालकाचे नांव स्वप्निल कुंडलिक ताड रा. गोपाळपूर ता पंढरपूर असे सांगितले. महिंद्रा बोलेरो कंपणीचे पिकअप मध्ये अंदाजे एक ब्रास वाऴू मिळून आली. या कारवाईत एक महिंद्रा बोलेरो कंपणीचे पांढर्या रंगाचा पिकअप ( MH13- CU 2274 ) एक ब्रास वाळु असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
           या प्रकरणी विशेष पथकाचे पोलीस कर्मचारी कल्याण विठ्ठल भोईटे वय 44नेम. पोलीस मुख्यालय यांनी भा.दं.वि.379 , 34 नुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *