गुन्हे विश्व निविदा सूचना

बाभुळगावच्या शेतकऱ्याच्या गोठयातून म्हशी लंपास

            थंडीचा कडाका वाढत चालला कि चोरीच्या घटना वाढतात हे जणू समीकरणच आहे.रात्री लवकरच शुकशुकाट होत असल्याचा फायदा चोरटे उचलत असून गेल्या काही दिवसात पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत व यात चोरटयांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे दिसून आले.दिनांक १९ डिसेंबरच्या मध्यरात्री पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी प्रसाद वसंत चव्हाण यांच्या गोठ्यांतील म्हशी चोरून नेल्याची घटना घडली आहे.या चोरीसाठी चोरटयांनी चारचाकी वाहनाचा वापर केला असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
              सदर प्रकरणातील फिर्यादी प्रसाद वसंत चव्हाण वय. 42 रा. बाभूळगांव ता. पंढरपुर यांच्या शेतात खिलार गाई व म्हशीसाठी पत्र्याच्या शेडचा गोठा असून त्यांच्याकडे खिलार गायी, म्हैस, जर्सी कालवड असे एकूण 09 जनावरे आहेत.फिर्यादी सकाळी 06.00 वाजता शेतात गेले असता सदर पत्र्याचे शेड मध्ये बांधलेली तीन म्हशी व एक रेडी अशी चार जनावरे दिसली नाहीत. आजूबाजूस शेतात शोध घेतला परंतू ती मिळून आली नाहीत.पाठीमागील बाजूस लावलेला हँलोजन काढून ठेवला आहे व तेथेच मला चार चाकी वाहणाचा टायरमार्क दिसला.चोरीस गेलेल्या म्हशीं व रेडीचे वर्णन खालील प्रमाणे 1) 30000 रू कि. एक मुरा जातीची काळ्या रंगाची म्हैस शिंगे पूढील बाजूस वळलेली वय.अं. 5 वर्ष कि.अं.2) 60000रू. कि. दोन क्राँस मुरा जातीच्या काळ्या रंगाच्या शिंगे पाठीमागील बाजूस सरळ वय.अंदाजे 3 वर्ष कि.अं.3) 10000रू. कि. एक काळ्या रंगाचे मुरा जातीची रेडी अंदाजे दीड वर्षाची 1,00,000 रू. अशा अंदाजित किमितची जनावरे चोरीस गेल्याची फिर्याद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *