Uncategorized

आत्याच्या मुलानेच केली घरातून दुचाकीसह लाख रुपयाची रक्कम लंपास

          पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील शेतकरी कल्याण तुकाराम सुतार यांच्या घरी त्यांच्या आत्याचा मुलगा सतिश सुभाष कऴसकर रा. विट खेडा औरंगाबाद, हा कामासाठी एक महिण्यापासुन राहण्यास आला होता.व चुलत भाऊ उमेश निवृत्ती सुतार यांचे श्री विठ्ठल फँब्रीकेशन दुकानात काम करत होता.फिर्यादी कल्याण सुतार यांच्याकडे त्यांचा मावस भाउ लखन चंद्रकांत मोरे रा. दहेगांव ता. माऴशिरस यांनी जमिनीच्या व्यवहारासाठी १ लाख रुपये उसने मागितले होते.हे उसने पैसे देण्यासाठी फिर्यादीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या करकंब शाखेतून ५० हजार रुपये एफडी मोडून तर ५० हजार तर चूलत भाऊ उमेश निवृत्ती सुतार याचेकडुन 50,000 रुपये उसने घेऊन मावस भाउ लखन चंद्रकांत मोरे यांना देण्यासाठी घरातील कपाटात ठेवली होती.याची माहिती आत्याचा मुलगा सतिश सुभाष कऴसकर याला होती.सदर प्रकरणी आरोपीने फिर्यादीची नजर चुकवून फिर्यादीच्या भावाच्या दुचाकीसह १ लाख रुपयांची रक्कम घेऊन दिनांक25/12/2020रोजी सायकांऴी 7/00 वा चे सुमारास पलायन केले असून या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           या प्रकरणी रोख रक्कमेचे व मोटार सायकलचे वर्णन खालील प्रमाणे1)1,00,000/-रोख रक्कम त्यामध्ये 500 रु दराच्या भारतीय चलनाच्या 200 नोटा 2)15,000/-एक काऴ्या रंगाची पांढरा पटा असलेली हीरो कंपनीचा फँशन प्रो मडेलची तिचा आरटीओ क्रमांक MH-13 BP-8353 तिचा चेसी नं MBLHA10AWDHK77551,इंजिन नं HA10ENDHK02568 असा एकूण 1,15,000/- रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद जळोली येथील शेतकरी कल्याण तुकाराम सुतार यांनी दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *