पंढरपूर शहर व शहरा लगतच्या उपनगरातून अगदी घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे अशातच आता कोर्टी रोड वरील परिचारक नगर येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने,देवतांच्या चांदीच्या मूर्ती तसेच ५ हजार रोख रक्कम व घरातील सोनी कंपनीचा एलसीडी टीव्ही लंपास केला आहे. या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात महेश बडवे यांनी दाखल केलेल्या […]
Tag: #chori
पंढरपूर शहरातून पुन्हा दोन मोटारसायलची चोरी
पंढरपूर शहरातील गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या मोटारसायकली चोरटे हातोहात लंपास करत असल्याच्या घटना गेल्या काही महिन्यात वारंवार घडत असून आता पुन्हा ७ व ८ सप्टेंबर रोजी शहरातून दोन मोटर सायकली चोरटयांनी लंपास केल्या आहेत.या प्रकरणी दोन्ही मोटार सायकलच्या मालकांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनुसार मकरंद पुरुषोत्तम कुलकर्णी रा.गोविन्दपुरा पंढरपुर यांचे […]
पंढरपूरात मॉर्निग वॉक वरून परतणाऱ्या डॉक्टर पत्नीचे सव्वालाखाचे मंगळसूत्र लंपास
पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येते.मोटार सायकल चोरीच्या घटना तर नित्याची बाब झाली असून अनेकवेळा भरदिवसा चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याचेही दिसून येते.शहरातील धनिकांची वसाहत समजल्या जाणाऱ्या परदेशी नगर सारख्या काही उपनगरात घरफोडी व छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी भरदिवसा वयोवृद्ध डॉक्टर आपल्या पत्नीसह […]
टाकळी रस्त्यावरील घरासमोरून हिरो स्प्लेंडरची चोरी
गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व आजूबाजूच्या उपनगरात मोटार सायकल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने एसटी मध्ये वाहक असलेल्या आनंद नगर टाकळी येथील मिलिंद एकनाथ महामुनी यांनी आपल्या हिरो स्प्लेंडरला जिपीएस सिस्टीम बसवून घेतली होती. दि. 24/08/2021 रोजी रात्रौ 11/30 वा. चे सुमारास त्यांनी आपली स्प्लेंडर MH 13 DB 4620 हि दुकाची घरासमोर हॅन्डल लॉक करून […]
कपडे खरेदी करून आलोच म्हणत सालगड्याने पळवून नेली स्प्लेंडर
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख हे आपल्या कीर्तनात नेहमी सांगतात शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूर सुखी आहे आणि त्याचा प्रत्यय अनेक शेतकऱ्यांना वेळोवेळी आलेला आहे.मात्र तरीही सालकरी गडी मिळणे म्हणजे मोठे दिव्य समजले जाते.त्याला उचल देणे,त्याला वर्षाचा माल भरून देणे,त्याची राहण्याची सोय करणे,त्याला दूधदुभतं खाण्यासाठी देण्याचे मान्य करणे आदी अनेक अटी लादणारे शेतमजूरही आढळून येतात पण शेती तर […]
डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा, दाम्पत्याला बांधून 66 लाखांची लूट
पुणे : लोणवळ्यात वरिष्ठ डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीचे हात-पाय बांधून सहा दरोडेखोरांनी चोरी केली. 66 लाखांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाल्याचा दावा खंडेलवाल दाम्पत्याने केला आहे. दरोडेखोर दोरखंडाने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि […]
पंढरीत अट्टल दरोडेखोरासह मोटार सायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद
पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं ३०७/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक २१/०५/२०२१ रोजी दाखल असून सदर गुन्हयाचे तपासकामी मा. श्री. विकम कदम सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर व पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असताना पंढरपूर शहर पोलीस ठाणे […]
नेमतवाडी येथे सव्वा लाखाची धाडसी चोरी
करकंब/ नेमतवाडी येथ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चंद्रकांत पवार यांच्या घरी चोरी करून सोन्या चांदीच्या दाग-दागिने व रोख रक्कम अशी सुमारे एक लाख साडे अकरा हजाराची चोरी केल्याने नेमतवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार चंद्रकांत पवार हे आपली पत्नी, मुलगी व नातू यांच्यासह नेमतवाडी येथे राहतात त्यांची दोन्ही […]
पोलिस असल्याची बतावणी करत दागिने केले लंपास
सांगली येथील एका अज्ञाताने पोलीस असल्याचे बतावणी करून आप्पासाहेब पाटीलनगरमधील महिलेचे २ तोळ्यांचे दागिने लंपास केले आहे. हि घटना शनिवारी घडली आहे. मंगल दिलीप नाईक (वय ५८, रा. आप्पासाहेब पाटीलनगर, सांगली ) या महिलेने या प्रकरणावरुन सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरून शहर पोलिसांकडून त्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, […]
अबब !700 कोटीची करचोरी
आयकर विभागाने धाड टाकून केलेल्या कारवाईत ७०० कोटींची करचोरी समोर आली असल्याचा दावा केला आहे. आयकर विभागाकडून हैदराबादमधील दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर धाड टाकत कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान ११ कोटी ८८ लाखांची रोख रक्कम तसंच १ कोटी ९३ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) दिली आहे. कारवाई करण्यात […]